
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या संचालक मंडळाच्या मिटींग मध्ये संघाचे ३१ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल स्व.आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या स्मारकाजवळ त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आला.यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि गोकुळने विकासाची घौडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवलेली आहे. दूध उत्पादकांचे हित जोपसताना ग्राहकांचा विश्वास देखील चांगल्या प्रकारे संपादन केलेला आहे. यासाठी गोकुळच्या प्रत्येक कर्मचा-याची साथ असून योगदान मोलाचे आहे.निवृत्त झालेल्या सर्व कर्मचा-याची कष्ट करण्याची वृत्ती, कामावरील निष्ठा प्रशंसनीय आहे. असे मानोगत व्यक्त केले व पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले संघसेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांनी पुढील आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला द्यावा व समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.सेवानिवृत्त सेवानिवृत्त कर्मचा-यांमध्ये सुरज समुद्रे,आनंद करपे, हरीभाऊ देवर्डे, मोहन मोरे, तानाजी डोंगळे,संतराम कांबळे,लक्ष्मण गुरव,शिवाजी कांबळे, राजाराम कांबळे, लक्ष्मण पाटील, भरत कदम, रघुनाथ पाटील, बाजीराव पाटील, रंगराव पाटील,संभाजी कदम, केरबा भोपळे,राजेंद्र पाटील,अशोक गायकवाड,अशोक जगताप,प्रकाश डोंगळे, गंगाराम मोकाशी,अशोक म्हसवेकर, शिवाजी वाळवेकर,अरूण लोंढे,अर्जुन गावडे, चंद्रकांत यादव,आनंद कुंभार,मधुकर मगदूम, आप्पासाहेब जाधव, जोतीबा मनवाडकर, आनंदा मगदूम, यांचा समावेश आहे.
Leave a Reply