
निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या हाताला लागणार नाही : संजय पवार
कोल्हापूर: एवढे सत्ता नाट्यंतर घडल्यानंतर सुद्धा शिंदे गटातील कोकणातील आमदार व त्यांचे काही एजंट कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना काही आमिषे दाखवून आपल्याकडे खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. ते कदापिही सफल होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रात असे अनेक एजंट विनोद निष्ठावंत शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी अशा एजंटापासून शिवसैनिकांनी सावध राहणे गरजेचे आहे, अशी माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दोन मंत्र्यांना आपली सत्ता टिकणार नाही हे लक्षात आले आहे व एजंट यांच्या माध्यमातून एजन्सी वापरून पदाची तसेच आर्थिक अमिषे शिवसैनिकांना दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये. तसेच निष्ठावंत शिवसैनिक यांच्या हाताला लागणार नाही. ही अतिशय शरमेची बाब आहे. महाराष्ट्रात यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. असेही संजय पवार यांनी सांगितले. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त एक लाख सभासद नोंदणी फॉर्म घेऊन मातोश्रीवर जाणार असल्याचे तसेच त्या दिवशी दुचाकी रॅली व प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करावा असे आवाहनही केले.पत्रकार परिषदेला रविकिरण इंगवले विजय देवणे, सुनील मोदी, हर्षल सुर्वे उपस्थित होते.
Leave a Reply