
कोल्हापुर: गेली 7 वर्ष समाजातील तृतीयपंथी समाजाला सोबत घेऊन,समान वागणूक देऊन रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूर या क्लबचे सुरु असलेले समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे असे सौ.मोश्मी आवाडे यांनी सांगितले.रोट्रेक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूरच्या 8व्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या.यावेळी डॉ.प्रेरणा पाटिल-शेळके यांनीअध्यक्ष म्हणुन तर दर्शन बागी व ओम हत्तरकी यांनी सचिव म्हणुन पदभार स्वीकारला.यावेळी बोलताना त्यांनी,”या क्लबच्या कामाची प्रशंसा केली,तसेच गेली सात वर्ष क्लबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना होत असलेली मदत व क्लबकडुन जपले जात असलेले समाज हित या बद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच केंद्र सरकारच्या आवाहना नुसार देशात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या “हर घर तिरंगा”,या मोहिमेत सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.कार्यक्रमाचे installing officer रो.प्रा.महादेव नरके सर यांनी बोलताना विविध उदाहरणाचा दाखला देत क्लबचे काम चांगल्या पद्धतीने कसे पुढे न्यायचे या बाबतीत मार्गदर्शन केले. तसेच रोटरीचा जगाच्या इतिहासात असलेला वेगळा दबदबा या विषयी सांगितले.यावेळी मावळते अध्यक्ष तेजस सावंत यांनी मागिल यशस्वी वर्षातील कामाचा आढावा घेतला. तर रो.पंकज बामणे यांनी सेक्रेटरीयल रिपोर्ट सादर केला.यावेळी रो.राज कोरगावकर,रो.साहिल गांधी, रो.सौरभ कुलकर्णी यांनी आपली मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाला कोल्हापूर झोनमधिल वेगवेगळ्या क्लबचे अध्यक्ष,सेक्रेटरी,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.
Leave a Reply