
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुर जिल्हा हा वैविध्यतने संपन्न असा जिल्हा आहे.शिवाय कोल्हापूर ही कलानगरी शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते या नगरीला कलेचा वारसा लाभलेला आहे करवीर निवासिनी आई अंबाबाई च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीतील पन्हाळा याठिकाणीं निसर्गरम्य वातावरणात धावणे म्हणजे शरीरासाठी शरीराला ऊर्जा देणारे असेच आहे. याच उद्देशाने कोल्हापूरकरांसाठी व देशविदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व असोसिएशन इन शांतिनिकेतन यांच्या वतीने येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी ही ३१ जुलै पर्यंत करावयाची आहे.आता पर्यंत दिल्ली, लातूर,सोलापूर,हुबळी,धारवाड,बेळगाव, नाशिक,सांगली,विटा अशा विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी नाव नोंदणी केलेली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागठिळक उदय पाटील,आयर्नमॅन वैभव बेळगावकर,असोसिएशन इन शांतिनिकेतनचे उपप्राचार्य श्रीपाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.पन्हाळा हा ऐतिहासिक वास्तू जपा असा संदेश या मॅरेथॉन मधून दिला जाणार आहे.यावेळी डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गड किल्याचे जतन व संवर्धन करावे असे आवाहन करण्यात आले.स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत असणार आहेत.डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले,अँड.अनुजा मेहेंदळे आदी पदाधिकारी संयोजन करत आहेत.
Leave a Reply