
कोल्हापूर :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहना नुसार सर्वांनी हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी व्हावे,असे प्रतिपादन रेसर,युटयूबर श्री.कृष्णराज महाडिक यांनी केले.रोट्रेक्ट क्लब ऑफ के.आय.टी सनशाईन या क्लबच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी रोटरी क्लब ऑफ़ सनराईज चे अध्यक्ष रो.ह्रषीकेष खोत यांच्या हस्ते,आणि कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत रो.तनया भट यांनी अध्यक्ष म्हणून तर रो.इशा कोल्हापुरे यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.यावेळी कृष्णराज महाडिक यांच्या व मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.तसेच भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त आणि आदरणीय पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतीसाद म्हणून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या हर घर तिरंगा मोहीमेच्याजनजागृतीची रोट्रेक्ट मुव्हमेंट इन कोल्हापूरच्या वतीनेसुरवात म्हणुन श्री.कृष्णराज यांच्या हस्ते तिरंगा ध्वज नुतन अध्यक्ष रो.तनया भट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.तसेच यावेळी सर्वांनी आपले सोशल मिडिया प्रोफाईल फोटो बदलून तिरंगा ध्वज ठेवले.या कार्यक्रमाला के.आय.टी कॉलेजचे प्रा.श्री.संदिप देसाई सर,रो.साहिल गांधी,कोल्हापूर झोनचे झेड.आर.आर.रो सौरभ कुलकर्णी, क्लबच्या माजी अध्यक्षा रो.प्रांजली सुर्यवंशी,सेक्रेटरी रो.विश्वा सावंत आदिंसह कोल्हापूर झोन मधील सर्व क्लबचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणी रोट्रेक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply