
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- भाजप युती शासनाकडून सुरु असून, शिवसेना – भाजप युतीचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना राज्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा वाढता पाठींबा पहावयास मिळत असून, क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने दि.९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता “दसरा चौक, कोल्हापूर” येथून क्रांती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीच्या सुरवातीस जिल्ह्यातील दहा जेष्ठ शिवसैनिकांच्या वतीने क्रांती ज्योत प्रज्वलित करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. दसरा चौक येथून या दुचाकी रॅलीस सुरवात होणार आहे. दसरा चौक मार्गे – अयोध्या टॉकीज, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिंग, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, जोशी गल्ली कॉर्नर, शहीद भगतसिंग चौक, शिवालय कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रॅलीचा मार्ग असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅली सांगता करण्यात येणार आहे. या रॅलीस कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील तमाम कट्टर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
Leave a Reply