
कोल्हापूर /प्रतिनिधी : आहारावर नियंत्रण केल्यानेच आयुष्य सुखी होते. यासाठी दिवसातून फक्त दोनदा पोटभर जेवणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच हे जेवण ५५ मिनिटात संपवणे. आणि रोज ४५ मिनिटे व्यायाम केल्याने वजन कमी होते. पोटाचा घेर कमी होतो व यातून मधुमेहापासून मुक्तता होते. असे प्रतिपादन मधुमेह तज्ञ व आहार तज्ञ संशोधक प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत मार्गदर्शन करत होते. सततच्या खाण्यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिन तयार होते. इन्सुलिनमुळे आपण लठ्ठ होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील चरबी वाढणे इत्यादी प्रकार घडतात. याच्यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो. त्यामुळे इन्शुरन्सची पातळी कमी करण्यासाठी कमी वेळा खाणे अतिशय उपयुक्त आहे. म्हणूनच आपण दिवसातून फक्त दोनदा जेवणे आवश्यक आहे. गोड कमी खाणे हे देखील आरोग्यासाठी चांगले आहे. गुळ , साखर हे शरीरासाठी घातक आहे. दोन वेळा जेवताना प्रथम गोड पदार्थ नंतर सॅलेड व नंतर मुख्य अन्य यांचे सेवन करावे. अशा आपल्या जीवनशैलीत बदल केल्यामुळे आपण सर्व रोगांवर मात करू शकतो व मधुमेहापासून कायमची मुक्ती मिळवू शकतो, असेही डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले. माध्यम सहयोग कोल्हापूर प्रेस क्लब होते.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी महोत्सवानिमित्त लोकांसाठी लोकप्रबोधन पर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. यासाठी सामान्य लोकांना व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यासाठी अशा व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले आहे, असा उद्देश कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई यांनी प्रास्ताविकात विशद केला. कार्यवाह डॉ.उद्धव पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. अमर अडके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रभारी अध्यक्षा डॉ. राधिका जोशी,समन्वयक डॉ. रविंद्र शिंदे,डॉ. किरण दोशी,डॉ. ए.बी.पाटील,डॉ. राजेंद्र वायचळ,डॉ. शैलेश कोरे,डॉ. अशोक जाधव,डॉ. संदीप साळोखे,डॉ. आनंद कामत,डॉ.पी.एम.चौगुले,डॉ.एन. वाय.जोशी, डॉ. सूर्यकांत मस्कर यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
Leave a Reply