
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उजळाईवाडी विमानतळ विस्तारीकरणासाठी मुडशिंगी गावची एकूण 64 एकर जागा संपादित करणे बाबत कार्यवाही सुरू आहे. परंतु ही कार्यवाही करताना विभागातील संबंधित अधिकारी जमीन धारकांना चुकीचा मोबदला देऊन भीती दाखवून संमती पत्र घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. विमान विस्तारीकरणासाठी जागा संपादित केली पाहिजे व कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे. परंतु ज्या पद्धतीने संपादित प्रक्रिया केली जात आहे ती चुकीची आहे. यासाठी संपादित होणाऱ्या जागेचे मूल्य ठरवण्यासाठी शासकीय समितीने ने. जागेचे मूल्य कसे ठरवले याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या प्रमाणपत्रावर खातेदारांना तक्रार करण्याची व योग्य दर मागणीची संधी व वेळ देण्यात यावा. त्यानंतर निर्णय घ्यावा. विस्तारीकरण जागेमध्ये प्रादेशिक मोजणी प्रमाणे जर पिवळा पट्टा असेल तर त्याचा दर हा प्लॉटच्या रेडीरेकनर प्रमाणे पाचपट मिळावा. यासारख्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. यावेळी संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी,पोपट दांगट,हर्षल सुर्वे, राहुल गिरुले,संदीप दळवी,बाबुराव पाटील,विराज पाटील,विनोद खोत, मंजित माने,दीपाली शिंदे,स्मिता सावंत,अवधूत साळोखे, दिनेश परमार,राजू यादव,बाळासाहेब नलवडे,सचिन नागटीळक ,प्रीती क्षीरसागर,अवदेश करंबे,राहुल माळी,वैभव जाधव उपस्थित होते.
Leave a Reply