कोल्हापूर जिल्ह्यात बीएसएनएलच्या १२३ नवीन टॉवर उभारणीला मंजुरी; खा.महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

 

कोल्हापूर: ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण टॉवरची संख्या कमी असल्याने, रेंजच नसल्याचा अऩुभव आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणांची संपर्कच होत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच बिकट परिस्थिती आहे. संभाषणाची साधने दुर्गम वाड्यावस्त्यांवर पोहोचावीत यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी बीएसएनएल च्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून, बीएसएनएलच्या फेज ८.४ योजनेअंतर्गत जिल्ह्यात १२३ नवीन टॉवर उभारणीला मंजुरी मिळालीय. चंदगड, गगनबावडा, गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील दुर्गम भागातील जनताही मोबाईलच्या रेंजमध्ये येणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यापैकी ८८ टॉवर उभारणार आहेत.
सध्याच्या मोबाईल युगामध्ये ग्रामीण भागात मात्र अगदी मोजक्याच मोबाईल कंपन्यांची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवेवरच या भागातील रहिवाशांना अवलंबून रहावे लागते. पण टॉवरची अपुरी संख्या असल्याने, रेंजचा प्रॉब्लेम हे कायमचे दुखणे बनले होते. दुर्गम वाड्यावस्त्यांची तर परिस्थिती खूपच बिकट होती. अडीअडचणीच्या कालावधीत, मेडिकल इमर्जन्सीमध्ये रेंज नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व प्रश्‍नांचा अभ्यास खासदार धनंजय महाडिक यांनी केला. बीएसएनएलची टॉवर उभारणी मोठ्या संख्येने झाली, तर हा प्रश्‍न सहज सुटू शकेल, असे ध्यानात आल्यानंतर खासदार महाडिक यांनी त्या दृष्टीकोनातून बीएसएनएल अधिकार्‍यांच्या बैठकी घ्यायला सुरुवात केली. दिल्ली येथे वरिष्ठ पातळीवर बैठका आणि पत्रव्यवहार झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. त्यामुळेच बीएसएनएलच्या फेज ८.४ या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये १२३ नवीन मोबाईल टॉवर उभारणीला परवानगी मिळालीय. त्यापैकी ८८ टॉवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. त्याअंतर्गत भुदरगड मधील दुर्गम आणि ग्रामीण ठिकाणी ३, चंदगडमध्ये ७, गगनबावडा येथे ४ टॉवरची उभारणी होणार आहे. यासह आजरा, कागल, करवीर, राधानगरी या तालुक्यातही विविध ठिकाणी मोठ्या संख्येने टॉवर उभारले जाणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील मोबाईल रेंजची समस्या सुटून, ही सर्व ठिकाणे कव्हरेजच्या आत येतील, असा विश्‍वास निर्माण झाला. प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, येत्या वर्षभरात ग्रामीण भागासह दुर्गम ठिकाणांचे मोबाईल नेटवर्क भक्कम होईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांची मागणी मार्गी लागून, ही समस्या सुटेल असे सकारात्मक चित्र आहे.

 

One response to “कोल्हापूर जिल्ह्यात बीएसएनएलच्या १२३ नवीन टॉवर उभारणीला मंजुरी; खा.महाडिक यांच्या प्रयत्नांना यश”

Leave a Reply to Vikas Lulle Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!