
कोल्हापूर : ग्रामीण पत्रकारांच्यासाठी शिकण्यासारखे खूप आहे, पत्रकारितेतील बदलते स्वरुप लक्षात घेण्यासाठी ग्रामीण पत्रकारांची गरज आहे. ग्रामीण भागाचा विकास साधणा-या माहितीचे लेखन करुन पत्रकारांनी ग्रामीण भागाचा विकास साधावा, असे प्रतिपादन कॅन्सर सेंटरचे कॅन्सरतज्ञ डाॅ. सुरज पवार यांनी केले.
मुस्लीम बोर्डिंग, दसरा चैक येथे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेतर्फे ग्रामीण पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेत ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभागाचे सुरज गुरव, माजी शिक्षण संचालक महावीर माने, कार्यकारी अभियंता रंगराव पांडे, मानसी कन्सट्रक्शनचे मोहन गोखले, बोध्द अवशेष व विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी. एस. कांबळे, माजी पोलिस निरीक्षक आर. बी. जमादार, सामाजिक कार्यकर्ते सुशिलकुमार कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डाॅ. पवार म्हणाले, जनमाणसांमधील विश्वास संपादन करत पत्रकारांनी सर्वसामान्यांच्याबाजूने लेखन करायला हवे. ग्रामीण भागाचा विकास हा पत्रकारितेचा मोठा विषय असतो, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पत्रकारितेचे बदलते स्वरुप लक्षात घेउन आपल्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे.
करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव म्हणाले, एखादी व्यक्तिने गुन्हा केला तर त्या संपूर्ण जमातीला दोष देणे चुकीचे आहे, यासाठी पत्रकारांनी सर्वबाजू बघून लेखन करावे. कार्यकारी अभियंता पांडे म्हणाले, मानवाच्या कल्याण बघणारे पुरोगामी लेखन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी अभ्यास करुन प्रत्येक माहितीची चिकीत्सा करावी. माजी शिक्षण संचालक माने यांनी पत्रकारितेमधील बदलती आव्हाने या विषयावर भाष्य केले. माजी पोलीस अधिक्षक आर.बी. जमादार यांनी पत्रकार कसा असावा, या विषयाची माहिती सांगितली. मानसी कन्ट्रक्शनचे गोखले यांनी पत्रकारांनी पाळावयाच्या आचारसंहिता या विषयीची माहिती दिली.
यावेळी शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र व संवादशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. शिवाजी जाधव यांनी ग्रामीण पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन केले. दैनिक पुढारीचे सहायक उपमुख्यप्रतिनिधी अनिल देशमुख यांनी ग्रामीण पत्रकारांच्यासमोरील आवाहने, सकाळचे उपसंपादक सर्जेराव नावले यांनी बातमीतील लेखन कौशल्य, उसपंादक शरद यादव यांनी बातमी लेखन, वेगळे विषय, तरुण भारतचे उपसंपादक संग्रामासिंह पाटणकर यांनी शुध्दलेखन या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सांगली, सातारा कोल्हापूरमधील पन्नासहून अधिक ग्रामीण पत्रकार, प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव गुरव, कार्यकारी संचालक प्रमोद कांबळे, सचिव समीर मुजावर कडगांवकर, महेश बावडेकर, सदानंद डिगे, गौरव पणोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply