
स्टार प्रवाहनं कायमच नाविन्यपूर्ण कथानक असलेल्या मालिकासादर केल्या आहेत ज्यांच्या कथा सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी नातंसांगणाऱ्या आहेत. या आधी कोल्हापूरची पार्श्वभूमी लाभलेल्या स्टारप्रवाहच्या ‘देवयानी’, ‘पुढचं पाऊल’ या मालिका म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. या मालिकांवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं. या मालिकांमध्ये ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या रुपानं महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.
‘नकळत सारे घडले’ ही कथा आहे परीची. लडिवाळ आवाजात तिनं विचारलेल्या ‘मी तुला आई म्हणू…?’ या तिच्या प्रश्नानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील ह्या छोट्या परीनं प्रत्येकाच्या मनात जागापटकावली आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, १०० हून अधिकऑडिशननंतर ही परी सापडली.
‘नकळत सारे घडले’ या मालिकेची मूळ संकल्पना आहे स्टार प्रवाहक्रीएटीव्ह टीमची. स्टार प्रवाहने अभिनेता स्वप्नील जोशीच्या जिसिम्सया संस्थेला या मालिकेची निर्मिती करायची सुवर्ण संधी दिली. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेतउलगडणार आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवडस्टार प्रवाहने केली आहे. मात्र, मालिकेचे प्रोमो सुरू झाल्यापासूनछोटी परी चर्चेत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १०० हून अधिकऑडिशन घेतल्यानंतर ही परी सापडली.
परीच्या निवडीविषयी स्टार प्रवाहचे प्रवक्ते म्हणाले, ‘आम्हाला याभूमिकेसाठी अतिशय निरागस चेहऱ्याची मुलगी हवी होती. मात्रआताच्या काळात लहान मुलं आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युअरदिसतात आणि वागतात जे आम्हाला नको होतं. महाराष्ट्रभरातूनआलेल्या १००हून अधिक छोट्या मुलींची आम्ही ऑडिशन घेतली. मात्र, कुणीच योग्य वाटेना. अचानक एका ऑडिशनमध्ये ही परीसापडली. ती ज्या आत्मविश्वासानं ऑडिशनला उभी राहिली, तेपाहूनच आम्ही तिला निवडलं. ती खूप गोड आहे, निरागस आहेआणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसारखीच आहे. ही परी प्रेक्षकांच्यामनात घर करणार, ही आमची खात्री आहे’.
गाडी, बंगला, नोकर, सगळं आहे परीकडे, पण आईची माया ती सगळ्यांमध्ये शोधते. मिळेल का कधी तिला मायेची उब? या छोट्या, लाघवी परीचा प्रवास न चुकता पहा ‘नकळत सारे घडले’ मध्ये सोमवार ते शनिवार सायं. ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply