
पासपोर्ट प्रक्रिया होणार सुलभ
कोल्हापूर : प्रतिनिधी
मार्च अखेर भारतात 251 ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. सध्या 60 ठिकाणी ही कार्यालये सक्रीय आहेत. पासपोर्टसाटी लागणार्या कागदपत्रांच्या संख्येतही घट करण्यात आल्यामुळे पासपार्ट प्रक्रिया अधिक सोपी होईल, असे प्रतिपादन परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञनोश्वर मुळे यांनी केले.
मलेशिया येथे योग्य कागदपत्रांअभावी फसवणूक होवून अडकलेल्या 5 युवकांची सुटका ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रयत्नाने झाली. पासपोर्ट प्रक्रिया, कागदपत्रे, अवैध एजंट… यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पासपोटंची व्याख्या प्रतिभेचे पंख अशी करता येईल. यामुळे परदेश दौर्याला महत्व आले. पण पासपोर्ट ची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्याकारणाने अनेकांनी परदेश दौर्याला लांबूनच राम राम ठोकला. पण हीच प्रक्रिया आता अत्यंत सुलभ होण्याच्या दृष्टीन विदेश मंत्रालयाने पावले उचलली आहेत. 50 किमीच्या आतच पासपोर्ट कार्यालय असावे या नियामानुसार देशात 251 ठिकाणी पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत.
परदेशात होणार्या फसवणूकीबद्दल बोलताना ते म्हणाले, अवैध एजंटांकडून गेल्यास फसवणूक होतेच. गेल्या तीन वर्षात 90 हजारांपेक्षा अधिक लोकांना सोडवलय. म्हणूनच राज्याराज्यात विदेश भवन सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार ऑगस्ट महिन्यात मुंबईत बांद्रा येथे उभारल्या जाणार्या पहिल्या विदेश भवनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर राज्यस्तरावर विदेश मंत्रालयाचा सचिव नेमण्याच्या हालचालीही सुरु आहेत. मजूर म्हणून विदेशात जाणारे भारतीय नागरीक फसवले जावू नयेत म्हणून त्याना दोन दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यासाठी प्रसार माध्यमे, स्वयंसेवी संस्था, पोलिस यंत्रणा, प्रशासन आणि नागरीक यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे.
यावेळी प्रेसक्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे,उपाध्याक्ष तानाजी पोवार, सतीश सरीकर आदींसह प्रेस क्बलचे संचालक उपस्थित होते.
चौकट
कोल्हापूर पासपोर्ट कार्यालयात शेतकर्यांसाठी पासपोर्ट : मुळे
कोल्हापूरच्या पासपोर्ट कार्यालयात खास शेतकर्यांच्या पासपोर्टसाठी शनिवार रविवार असे दोन दिवस राखीव ठेवू. या दिवशी फक्त शेतकर्यांच्याच पासपोर्टसाठी काम केले जाईल, असे ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.
चौकट
भारतीय विदेशी परराष्ट्र मंत्री नेमावा : मुळे
परदेशातल्या आपल्या नागरीकांची काळजी घेणारे परराष्ट्र मंत्री प्रत्येक देशाचे आहेत. पण भारताचा विदेशी परराष्ट्र मंत्री नाही. यामुळे भारतीय नागरीकांची फसवणूक झाल्यावर त्यांना सुरक्षितपणा देण्यासाठी भारतीय विदेशी परराष्ट मंत्री नेमणे आवश्यक असल्याचे मत ज्ञनोश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
Leave a Reply