केआयटीच्या वतीने पायोनिअर 2018 चे आयोजन

 

कोल्हापूर: केआयटी कॉलेजने 1993 साली सुरु केलेल्या ‘पायोनिअर’ या राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धेचे 26 वे पर्व येत्या 10 व 11 फेब्राुवारीला कोल्हापूर इस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॅाजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरींग (स्वायत्त),कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. दोन दिवस चालणा-या या स्पर्धेत मध्यवर्ती स्तरावर ‘अभिव्यक्ती’(संशेाधन पेपर सादरीकरण) व ‘प्रदर्शनी’ (भित्तीचित्रे सादरीकरण) ह्मया दोन स्पर्धा होणार आहेत. तसेच विभागवार 18 पेक्षा जास्त स्पर्धा होणार आहेत. दोन्ही दिवशी ‘सुभाषितम्’ या नावाने व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे. विद्यार्थी आणि स्पर्धकांसाठी विविध मनोरंजक खेळ सुध्दा आयोजित केले आहेत.
दि. 10 फेब्राुवारी रोजी होणा-या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.आय.टी वेल्लोर विद्यापीठाचे प्रयोजित संशेाधन संचालक डॉ. जकारिया अॅलेक्स व सर्वोकंट्रोल अॅन्ड एरोस्पेस इंडीया प्रा. लि. बेळगाव चे संचालक मा. श्री दिपक धडोती उपस्थित राहणार आहेत.
‘अभिव्यक्ती’ या मध्यवर्ती संशेाधन पेपर सादरीकरण स्पर्धेत अंतरशाखीय दृष्टीकोन अवलंबिला आहे. यातील निवडक पेपर हे नंतरच्या प्रोसिडिंग्ज मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. प्रदर्शनी या मध्यवर्ती भित्तीचित्रे सादरीकरण स्पधेचे विषय हे विभागवार वेगळे ठेवण्यात आले आहेत.
पाहिल्या दिवशी ( दि.10 फेब्राुवारी ) जैवतंत्रज्ञान विभागाकडुन ‘बेनियाक’,स्थापत्यशास्त्र विभागाकडुन ‘लँड रिसेार्स मॅपिंग’, इलेक्ट्रॉनिक्स विभागाकडून ‘इसायकल’, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाकडुन ‘डिजीट्रायम्फ’, कॉम्प्युटर सायन्स विभागाकडून ‘ड़’ प्रोग्रामिंग, मेकॅनिकल विभागाकडून ‘फिनिक्स’, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाकडून ‘वेबस्टर’, प्रोडक्शन विभागाकडून ‘डिझाइन मेनिया’ या सर्व स्पर्धा पार पडणार आहेत.
दुस-या दिवशी ( दि.11 फेब्राुवारी ) रोजी जैवतंत्रज्ञान विभागाकडुन ‘वर्डक्राफ्ट’, प्रोडक्शन विभागाकडून ‘बेअर द लोड’, इलेक्ट्रॉनिक्स विभागाकडून ‘सर्किट ज्ञान’, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाकडुन ‘वोल्टाइक प्रेझ’, मेकॅनिकल विभागाकडून ‘आय रि न्यू’, पर्यावरण शास्त्र विभागाकडुन ‘शोध’, कॉम्प्युटर सायन्स विभागाकडून ‘जावा’ प्रोग्रामिंग या सर्व स्पर्धा पार पडणार आहेत.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण व समारोपासाठी घाटगे पाटील इंडस्ट्रिचे चेअरमन व व्यवस्थापक मा. श्री. किरण पाटील उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांसाठी तब्बल रु. 1,50,000/- ची रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व स्मृती चिन्हे देण्यात येणार आहेत.
यावर्षी स्पर्धेचा शुभंकर म्हणून ‘अभियांत्रिकी सिंह’तयार करण्यात आला असुन तो अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांचे प्रतिनिधीत्व करतो.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांची दोन महिन्यांपासून जय्यत तयारी चालु आहे. या सर्व स्पर्धांच्या नांेदणीसाठी विद्याथ्र्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. जवळपास तीन हजार विद्यार्थी या मध्ये स्पर्धक म्हणुन सहभागी होणार आहेत.
क्ष्च्च्र्क स्टुडंट चॅप्टरचे चेअरमन म्हणुन वरुण तनेजा, व्हा. चेअरमन म्हणुन स्वानंद गुळवणी व सिद्धी अवधूत ची नियुक्ती केली आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हण्ुन श्री एस. एस. माने व सहसमन्वयक म्हणुन श्री हर्षद ठाकुर काम पाहत आहेत. केआयटी चे चेअरमन श्री सचिन मेनन, व्हॅाइस चेअरमन श्री भरत पाटील, सेक्रेटरी श्री साजिद हुदली व केआयटी चे विश्वस्त मान्यवर तसेच संचालक श्री व्ही. व्ही. कार्जीन्नी, रजिस्टार श्री मनोज मुजुमदार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!