युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळालेल्या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक यांचा अनोखा उपक्रम, दसर्‍यानिमित्त वाटले चक्क खरे सोेने

 

समाजाविषयी आस्था आणि दातृत्व असलेल्या कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दसर्‍यादिवशी एक नवा अभिनव उपक्रम राबवला. गोरगरीब कुटुंबांना भेट देवून, त्यांना दसर्‍याचे सोने दिले. हे सोने म्हणजे केवळ आपटयाची पानं नव्हती, तर खरे सोने, साडी आणि मिठाई देवून त्या कुटुंबांना सुखद धक्का दिला. युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळणार्‍या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यावर्षी तर दसर्‍याला अस्सल सोने देवून त्यांनी आपल्यातील माणूसकी आणि बांधिलकी दाखवून दिली.

कृष्णराज धनंजय महाडिक हे नाव युटयुबवर सर्च केले, तर त्यांचे शेकडो व्हिडीओ ब्लॉग दिसून येतात. लाखो सबस्क्रायबर असणार्‍या कृष्णराज यांना युटयुबकडून मानाचे सिल्वर प्ले बटण हे ऍवॉर्डही मिळालंय. युटयुबकडून मिळणार्‍या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. यावर्षी तर कृष्णराजनी राबवलेला उपक्रम एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. दसर्‍यादिवशी कृष्णराज महाडिक यांनी काही गोरगरीब नागरिकांना थेट त्यांच्या घरी जावून सोने दिले. कोणतीही ओळख किंवा कुणाचाही संदर्भ न घेता, जे कष्टकरी आणि गरीब दिसले, त्यांच्या घरी जावून कृष्णराज महाडिक यांनी त्यांना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांना प्रत्येकी एक ग्रॅम अस्सल सोन्याचे नाणे बहाल केले. विक्रमनगरमध्ये राहणार्‍या शोभा सुतार यांच्या घरी अचानक जावून कृष्णराजनी त्यांना साडी आणि सोने दिले. तर लक्षतिर्थ वसाहतमध्ये राहणार्‍या शकुंतला शिंदे यांनाही कृष्णराज महाडिक यांनी असाच सुखद धक्का दिला. कोणतीही ओळख नसताना, कृष्णराज महाडिक आपल्या घरी आले आणि दसर्‍याच्या सदिच्छा म्हणून खरोखरचे सोने दिले, यावर शिंदे परिवाराचा विश्‍वासच बसत नव्हता. भारावून गेलेल्या शिंदे परिवाराने महाडिक कुटुंबीयांचे शतशः आभार मानले. तर नाना पाटीलनगर मधील प्रमिला आमले यांच्याही बाबतीत असेच घडले. कृष्णराज महाडिक यांनी, चक्क त्यांचा मागोवा घेत, घर गाठले आणि त्यांना सोन्याचे नाणे आणि साडी बहाल केली. त्यामुळं आमले परिवारही भारावून गेला होता. कृष्णराज महाडिक यांनी, दसर्‍यादिवशी खरोखरचे सोने देवून, या कुटुंबांबद्दल जी आस्था आणि आपुलकी दाखवली, दातृत्वाचे दर्शन घडवले, ते पाहील्यानंतर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी याचे यथार्थ दर्शन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!