
मुंबई : ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे युद्ध सुरू आहे. आयोगाकडून मिळालेल्या चिन्हाच्या मदतीने बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाईल, अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ते पुढे म्हणाले कि, सन १९६६ साली शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. सुमारे वर्षभराने १९६७ साली शिवसेनेने ठाण्यात पहिली महानगरपालिका निवडणूक लढविली होती. ठाण्यातील पहिल्या निवडणुकीत शिवसेनेने ढाल-तलवार हे चिन्ह घेतल होत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच पहिलं चिन्ह ढाल-तलवार होत. त्यामुळे ढाल-तलवार आणि शिवसेना हे खूप जुनं नात आहे. ‘ढाल-तलवार’ क्षत्रियांचे हे चिन्ह असून, हे युद्धाचे प्रतीक आहेत. यात बचाव आणि हल्ला दोन्हींची सोय असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत होत असलेली क्रांती हे एकप्रकारचे युद्ध असून, ढाल- तलवार या चिन्हाने या लढाई बळ मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याचा स्वाभिमान जिवंत ठेवणारे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना साजेचे चिन्ह आम्हाला मिळाले आहे. या चिन्हावर निश्चितच आम्ही आगामी निवडणुका जिंकून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित हिंदुत्वाची क्रांती महाराष्ट्र राज्यात घडवू, असा विश्वासही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
Leave a Reply