छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्षणीय यश   

 

महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल आज लागले असून, यामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वराज्य संघटनेला अपेक्षित यश मिळाले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ८९ ग्रामपंचायत सदस्य व १३ सरपंच म्हणून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते निवडुन आले आहेत.
यामध्ये कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर , बिड , लातूर, नगर, परभणी, रायगड, उस्मानाबाद या जिल्हातील ग्रामपंचायतीचा समावेश होतो.
स्वराज्य संघटना आजही सामाजिक क्षेत्रात कार्यरत वयंपुर्तीने  स्वराज्य संघटनेच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाग घेत आहेत, आणि लोकांचा त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.स्वराज्य संघटने राजकारणात यावे अशीच इच्छा लोकांची असल्याचे दिसून येते.यातून अधिक जोमाने काम करण्याची उर्जा आम्हा सर्वांना मिळत आहे.
जे लोक आमच्या सोबत आहेत, आणि येतील त्यांच्या पाठीशी भक्कम पणे आम्ही उभे राहू अशी छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रीया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!