
कोल्हापूर/प्रतिनिधी : रुकडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वार यांनी नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रूकडी मतदार संघातून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. त्यांनी वंचित बहुजनआघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवली होती.सौ .आसमा स्वार या दिव्यांग महिला आहेत, एक दिव्यांग महिलेने मिळवलेल्या विजयाने न्यू शाहूपुरीतील लोक भारावून गेले होते या विजयाचे अवचित्त साधून भागातील तरुण मंडळांनी त्यांचा जाहीर सत्कार केला.या सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक श्री कादरभाई मलबारी होते.त्यांच्या हस्ते सौ स्वार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रशासक मलबारी म्हणाले निवडून आलेल्या भागांमध्ये जास्तीत जास्त विकास कामे करून जनतेने दिलेल्या कौलाची परतफेड आसमा यांनी करावी, तसेच दिव्यांग असून सुद्धा आसमाने ग्रा.पं. निवडणुकीत सदस्य पदी निवडून येऊन जे यश मिळवले समाजाला याचा नेहमी अभिमान राहील असे उदगार काढले.
यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार समीर मुजावर यांनी दिव्यांग महिलेने मिळवलेल्या यशाचा समाजाने आदर्श घ्यावा असे सांगून स्वार यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नासर धारवाडकर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार युवा नेते वासिम मुजावर व सिकंदर जमादार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रुकडी मधील उपस्थित मान्यवरांचा सत्कार फय्याज स्वार व झाकीर स्वार यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास न्यू शाहूपुरी तंजिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष यासीन भाई जमादार, सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक ,अलबाज नाईक, नदीम पठाण ,इमरान शेख ,सलीम मोगल, सरफराज शेख तसेच प्रहार संघटनेच्या सदस्या जानकी मोकाशी ,सय्यद कापसे जरीना हकीम ,तसेच माजी नगरसेवक संजय निकम व रोहित कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. आसमा बडेखान यांना निवडनुकित बहुजन वंचित आघाडीचे नेते श्री जनार्दन कुबेर गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
Leave a Reply