कोल्हापूर – बेंगळुरू या पहिल्या इंडीगो फ्लाईटला हिरवा झेंडा

 

कोल्हापूर: कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी त्या शहराची इतर प्रमुख शहरांशी कनेक्टिव्हिटी असणे हे फार महत्वाचे असते. गेल्या काही वर्षात कोल्हापुरातून विमानसेवा सुरू व्हावी म्हणून आमदार सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश येऊन कोल्हापूर हवाई मार्गाने विविध शहरांना जोडले जात आहे.जमीन संपादन, MIDC कडून भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे कोल्हापूर विमानतळ हस्तांतर करणे, वनविभागाची जमीन विमानतळ प्राधिकरण कडे देणे, रनवे विस्तारीकरण, नाईट लँडिंग तसेच कार्गो हब सुविधा विषय मार्गी लावणे, नाईट लँडिंग मधील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टी कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील साहेब यांनी अगदी प्राधान्याने केलेल्या आहेत.आजपासून कोल्हापूर-बेंगळुरू मार्गावर विमानसेवा सुरू झाली. केंद्रीय राज्यमंत्री रिटायर्ड जनरल व्ही.के. सिंग, जॉईंट सेक्रेटरी एस.के.मिश्रा, इंडिगो चे प्रधान सल्लागार आर.के.सिंग, खासदार संजय मंडलिक, पुढारी चे संपादक प्रतापसिंह जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये विमानतळ टर्मिनल बिल्डिंगचे काम जलदगतीने करण्यात यावे, त्याचबरोबर कोल्हापूर मध्ये धुक्याचे प्रमाण अधिक असते. यासाठी इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सुविधा देण्यात यावी जेणेकरून फ्लाईट उशीर होण्यासारख्या समस्या उद्भवणार नाही. अशा प्रमुख दोन मागण्या केंद्रीय मंत्र्यांकडे केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!