
कोल्हापूर: वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
क्रिडा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात जलतरणाचीही वेगळी ओळख आहे. महापालिकेने १९७७ साली रंकाळा तलावा शेजारी अंबाई जलतरण तलावाची निर्मिती केली. या तलावात सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली. या तलावाची दुरवस्था झालेला हा टँक हा पोहण्यायोग्य करावा अशी मागणी केली जाता होती. आमदार ऋतुराज पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत २० लाख रुपये खर्चातून या टँकचे नुतनीकरण करुन घेतले.शनिवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हा टँक पोहण्यासाठी खुला करण्यात आला. यावेळी आम. पाटील यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद ही साधला. टँकच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करु अशी ग्वाही आम. पाटील यांनी यावेळी दिली. अंबाई टँकचे काम पूर्ण केल्याबद्दल पालकांनी आमदार पाटील यांचे आभार मानले. सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते ६ या वेळेत हा टँक सुरु राहणार असून सायंकाळी ५ ते ६ या हा कालावधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.यावेळी महापालिकेचे माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजेंद्र मगदूम, संभाजी पाटील, रंगराव पाटील, राकेश तिवले,महापालिकेचे इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उपशहर अभियंता एन एस पाटील अभियंता अनिरुद्ध कोरडे, सचिन देवाडकर यांच्यास विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.
Leave a Reply