‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 

कोल्हापूर: कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेले काही वर्षे आपण पहात आहोत की सातत्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. मुंबईचे प्रदुषण वाढत आहे, शाळा बंद ठेवण्याइतकी वाईट अवस्था दिल्ली येथील झाली होती. नद्या प्रदुषित होत आहेत. पंचगंगा देशातील प्रमुख ५ प्रदुषित नद्यांपैकी एक आहे. अशा स्थितीत पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी या महोत्सवांची अत्यावश्यकता आहे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी, डॉ. संदीप पाटील, शिवसेना खासदार (शिंदे गट)  संजय मंडलिक, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!