कोल्हापूर रन या मॅरेथॉनच्या मेडल आणि टी शर्टचे अनावरण

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी डी.वाय.पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित केएससी कोल्हापूर रन या मॅरेथॉनच्या मेडल आणि टी शर्टचे अनावरण आज करण्यात आले.कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब व रग्गेडियन यांच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे.

सध्या आरोग्य जपणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे . आपण सर्वजण स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम, योगासने यासारख्या गोष्टी करत असतो. क्रीडानगरी असलेल्या कोल्हापूरमध्येही फिटनेस कल्चर वाढत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षापासून आयर्न मॅन सिटी ऑफ इंडिया अशी ओळख आपल्या कोल्हापूरची ओळख ठळक झाली आहे .

डी वाय पाटील ग्रुप नेहमी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमासाठी सातत्याने पाठबळ देत असतो. कोल्हापूरात फिटनेस कल्चर वाढविणे तसेच आपल्या क्रीडा परंपरेला चालना देण्यासाठी ही मॅरेथॉन आम्ही आयोजित केली आहे . कोल्हापूरकरांचा या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.अजूनही ज्यांनी आपले रजिस्ट्रेशन केलेले नाही, त्यांनी रजिस्ट्रेशन करून या मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले .

या कार्यक्रमास आकाश कोरगावकर, चेतन चव्हाण, विजय कुलकर्णी, गोरख माळी, महेश शेळके, राज कोरगावकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डी.डी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!