
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी सलग १४ वर्षे आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य भीमा कृषी प्रदर्शन येत्या २६ ते २९ जानेवारी २०२३ या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन उद्या गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.तर अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार महादेवराव महाडिक यांची असणार आहे. तर सोहळ्यास खा.धनंजय महाडिक,माजी आ. अमल महाडिक, प्रभास फिल्मचे श्री संग्राम नाईक, जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय चव्हाण, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सौ.शौमिका महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, श्री सुहास देशपांडे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक व हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांनी केले आहे.
Leave a Reply