डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेचे २७ ते २९ जानेवारी दरम्यान

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात २८ व २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे.ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण करण्यात आली आहे.या स्पर्धेच्या टी. शर्ट व मेडलचे अनावरण हे कणेरी मठ येथे अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.

या दोन दिवस होणाऱ्या स्पर्धामध्ये २८ रोजी लहान मुलांसाठी बर्ग किड्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात ५ ते ११ वयोगटातील लहान मुलांचा समावेश असणार आहे. याचबरोबर २७ रोजी मुलांना किटचे वाटप केले जाणार आहे.२७ व २८ या दोन दिवशी बर्गमॅन ११३ मधील स्पर्धकांना किटचे वाटप केले जाणार आहे.ज्यात गुडी बॅग,टी. शर्ट,टाईम चीप याचा समावेश आहे.याचबरोबर याठिकाणी २७ व २८ रोजी एक्स्पो हा आयोजित करण्यात आला आहे.
२९ जानेवारीला स्विमिंग – १.९ किलोमीटर, सायकलिंग – ९० किलोमीटर आणि रनिंग – २१ किलोमीटर या स्पर्धा होणार आहेत. देशभरातील एकूण ८०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.या स्पर्धेमध्ये ट्रायथलॉन ही स्पर्धा तीन प्रकारांमध्ये होत आहे ज्यांना स्विमिंग येणार नाही त्यांना रनिंग आणि सायकलिंग या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या स्पर्धा २९ रोजी पूर्ण होणार असून तीन ते साडेआठ तास असा या स्पर्धेचा कालावधी आहे. स्पर्धा १८ ते ३०,३१ते ४०,४१ ते ५० व ५१ च्या पुढील सर्व अशा वयोगटात होणार आहेत सकाळी ६ वाजता बर्गमॅन डुएथलॉन ,६.१५ वाजता ऑलिंपिक डुएथलॉन,६.३० वाजता बर्गमॅन ११३ ची ट्रॉएथलॉन,६.४५ वाजता ऑलिंपिक ट्रॉएथलॉन,७ वाजता स्प्रिंट ट्रॉएथलॉन या वेळेत या विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
स्पर्धेनुसार बक्षीस वितरण होणार आहेत.या स्पर्धेचे आयोजन जयेश कदम,राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,डॉ. समीर नागटिळक,समीर चौगुले यांनी केले आहे.अनावरण प्रसंगी मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पाटील,डॉ. संदीप पाटील,बापू कोंडेकर,माणिक पाटील चुयेकर, मदन भंडारी राजेश डाके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!