
कोल्हापूर /प्रतिनिधी: उद्या शनिवारी २८ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोल्हापुरात बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली होती. तो भूमिपूजन सोहळा उद्या सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्या संबंधित सर्व निमंत्रण पत्रिका तयार झाल्या असून त्या वितरित झाल्या आहेत. परंतु त्या पत्रिकेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे आहेत पण कोल्हापूरचे दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि उत्तरच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे नाव मात्र पत्रिकेत छापलेले नाही. कोल्हापूरच्या विकासात या आमदारांचा मोलाचा वाटा आहे. कोल्हापूरसाठी एवढा मोठा प्रकल्प आणि याचे भूमिपूजन होत असताना या आमदारांची नावे पत्रिकेत नसल्याने नागरिकांमधून चर्चा होत आहे.
Leave a Reply