
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे आयोजित भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात १० लाख शेतकरी व नागरीकांनी भेट दिली. शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन, खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो त्यामुळेच पुढील प्रदर्शन आणखी व्यापक प्रमाणात भरविण्यात येईल अशी घोषणा आयोजक खासदार धनंजय महाडिक यांनी आज भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी केली. पृदर्शनाला भेट दिलेल्या शेतकऱ्यांसह जनतेचे त्यांनी आभार मानले.आज शेवटच्या दिवशी रविवार सुट्टी होती. त्यामुळे मेरी वेदर मैदानावर तुडुंब गर्दी झाली होती. चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली महिलां बचत गटांनी उभ्या केलेल्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून 50 लाखांची उलाढाल झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. भिमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल १२ कोटीची उलाढाल झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे.चार दिवसात कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तोबा गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.येथील झाडाला पिकलेली देशी सेंद्रिय केळी आकर्षण ठरली.भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी डॉ. जे.बी. पाटील, सहायक प्राध्यापक, यांनी शेंद्रीय कर्न व जमीनीचे अरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. जमीनीतील कर्ब कसे वाचले पाहीजेत याबाबत सोनी यांनी सविस्तर माहीती दिली.किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीड नियंत्रणाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यात खोड किडीसाठी ट्रायकोकार्ड, कामगंद सापळे व हुतगी नियंत्रणासाठी मेराऱ्यझियन या बुरशीचा वापर करावा असे किटकशास्त्रज्ञ डॉ.अभयकुमार बागडे यांनी सांगितले.ऊस पिकामध्ये येणारे प्रमुख रोग, त्याची ओळख कश्याप्रकारे करावी तसेच ऊस पिकामध्ये जैविक खतांचा वापर करण्याच्या पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथील डॉ.रविंद कारंडे यांनी केले.
Leave a Reply