शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याबद्दल शिवसैनिकांचा आनंदोत्सव

 

कोल्हापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याचा ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयाबद्दल कोल्हापुरातील शिवसैनिकांकडून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून ढोल ताशांच्या गजराज मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे”, “धर्मवीर आनंद दिघे”, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे” यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भगव्या अष्टगंधाची उधळण करण्यात आली. यासह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, महिला आघाडी महानगरप्रमुख शुभांगीताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख प्रवित्रा रांगणेकर, मंगलताई कुलकर्णी, गौरी माळतकर, मीनाताई पोतदार, शाहीन काझी, शारदा भांदिगरे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख दीपक चव्हाण, मंदार तपकिरे, सुरेश माने, टिंकू देशपांडे, सम्राट यादव, कपिल नाळे, कपिल केसरकर, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, रियाज बागवान, राजू काझी, प्रदीप मोहिते, शैलेश साळोखे, अक्षय कुंभार, आशिष पिंपळकर यांच्यासह शिवसेना, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!