
कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून नामदार शहा यांच्या दौर्यातील कार्यक्रमांचं सुक्ष्म नियोजन करण्यात आलं असून, आज खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रम स्थळांची पाहणी करत, कार्यकर्त्यांना सूचना केल्या.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये न्यू एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सवी वर्षाची सांगता, नागाळा पार्कातील भाजपच्या नूतन इमारतीची पाहणी, श्री गणेश मंदिराचं भूमीपूजन, याच ठिकाणी जाहीर सभा, हॉटेल पॅव्हेलियन मध्ये लोकसभा प्रवास योजनेच्या शुभारंभाच्या माध्यमातून प्रमुख नेते आणि पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार धनंजय महाडिक, नामदार शहा यांच्या पक्षातर्ंगत कार्यक्रमांचं सूक्ष्म नियोजन करत आहेत. यातून कार्यकर्ते, पदाधिकार्यांच्या बैठका खासदार महाडिक घेत आहेत.आज खासदार महाडिक यांनी, नागाळा पार्कातील पक्षाच्या नव्या कार्यालय परिसरात नामदार अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. सभास्थळी भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. १० हजारापेक्षा अधिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी या सभेला उपस्थित राहण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहूल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव यांच्याकडून खासदार महाडिक यांना सभेच्या अनुषंगानं माहिती घेतली. तसंच नियोजनाच्या दृष्टीनं खासदार महाडिक यांनी पदाधिकार्यांना सूचना दिल्या. शहा यांची कोल्हापुरातील ही सभा यशस्वी होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
खास. धनंजय महाडिक
नामदार शहा यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी होण्याच्या दृष्टीनं नियोजनात कोणतीही उणिव ठेवू नका, असंही खासदार महाडिक यांनी पदाधिकार्यांना सांगितलं. यानंतर खासदार महाडिक यांनी, पक्षाच्या नियोजित नव्या कार्यालयाची पाहणी केली. सुमारे ६ हजार चौरस फुट जागेत पक्षाचं भव्य कार्यालय उभारण्यात येत आहे. प्रमुख पदाधिकार्यांना स्वतंत्र केबीन, मिटींग हॉल, कॉन्फरन्स हॉल यासह सर्व सुविधांनी हे कार्यालय सुसज्ज करण्यात येणार आहे. प्रशस्त पार्कींग हे या कार्यालयाचं मुख्य वैशिष्टय आहे. आर्किटेक्ट इंजिनिअर मनोहर निकम आणि संजय आडके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ही भव्य वास्तू उभारण्यात येत आहे. नामदार अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा म्हणजे एकप्रकारे लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ असेल, असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघ आणि विधान सभेच्या जिल्हयातील १० मतदार संघांचा आढावा नामदार शहा हॉटेल पॅव्हेलियन मध्ये घेणार आहेत. तीनशेपेक्षा अधिक पदाधिकारी, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय नेते यांच्याशीच नामदार शहा संवाद साधणार आहेत. त्यामुळं हॉटेल पॅव्हेलियन मधील सभागृहाची पाहणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. सभागृहातील नियोजनाच्या दृष्टीनं महाडिक यांनी हॉटेल व्यवस्थापनाला काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, विजयसिंह खाडे -पाटील, प्रदिप उलपे, चंद्रकांत घाटगे, पृथ्वीराज महाडिक, ऍड. संपतराव पवार, गणेश देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply