
कोल्हापूर : डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दिक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२3 रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनरिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर एम.साळुंके या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली यांना डी.लीट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११.०० वाजता दिक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
अकराव्या दिक्षांत समारंभात एकूण ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ८ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. डॉ नवनाथ शंकर पडळकर या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठ एक्सलन्स इन रिसर्च अवार्ड जाहीर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. .
Leave a Reply