
कोल्हापूर: मुत्थुड फाईनकॉर्प लिमिटेड या संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘व्यापार मित्र’ या नवीन उत्पादनाच्या लोगोचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख अतिथी चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी राहुल नष्टे आणि हितेशभाई कपाडिया यांच्या हस्ते करण्यात अनावरण करण्यात आले. तसेच शुभारंभ प्रसंगी शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठ या भागातील लघु उद्योजक, कापड व्यापारी, उपस्थित होते. एरिया व्यवस्थापक सोनिया काटकर, शाखा व्यवस्थापक पंकज मोरे यांच्या वतीने उत्पादनाबद्दल माहिती सांगण्यात आली. लघु उद्योजकांसाठी सुरु करण्यात आलेल्या या उत्पादनाचा व्यापारी मित्रांनी कर्ज स्वरूपात लाभ घेण्यासाठी आवाहन यावेळी करण्यात आले.
Leave a Reply