
कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकर्यांचा आहे, असे फसवे शेतकरी प्रेम दाखवत ४०,००० शेतकर्यांकडून पैसे गोळा करत त्यांची केलेली फसवणूक आता पुराव्यानिशी उघडकीस आली आहे.कारखान्याच्या सभासदांकडून पैसे गोळा करून त्यांच्या हाती पावती टेकवली पण कारखान्याच्या शेअर्समध्ये मुश्रीफ कुटुंबातील विविध सदस्य आणि कंपन्या असे मिळून १७ जणांमध्येच हे भाग वाटले गेले आहेत. बाकीच्या चाळीस हजार शेतकऱ्यांचे शेअर्स कुठे आहेत? आबीद हसनसो मुश्रीफ, नाविद हसनसो मुश्रीफ, साजिद हसनसो मुश्रीफ, नबिला आबीद मुश्रीफ, सबिना साजिद मुश्रीफ, मतीन मंगोली, निलोफर मंगोली, नवरत्न असोसिएटस (एलएलपी), युनिव्हर्सल ट्रेडिंग कंपनी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी (एलएलपी), साबेरा हसनसो मुश्रीफ, तिलतमरीन नाविद मुश्रीफ, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स लि., सरसेनापती शुगर लि. हे १७ शेअर होल्डर्स तुमच्या घरचेच आहेत तर मग कारखाना शेतकर्यांचा कसा? आणि कारखाना जर शेतकर्यांचा आहे तर त्यांना कारखान्याचा अहवाल का जात नाही? कारखाना पब्लिक लिमिटेड आहे तर कारखान्याची जनरल बॉडी का नाही? आधी या प्रश्नांची उत्तरे द्या!४० हजार शेतकऱ्यांची फसवणूक करून ४० कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांनी शेतकर्यांच्या प्रति जिव्हाळ्याच्या आणि प्रेमाच्या गोष्टी करू नयेत..!४० हजार मधील १६ शेतकरी सभासदांनी मा. आमदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि उर्वरित सर्वांनीही आता गप्प बसू नये, असे आवाहन मी सर्वांना करतो.मी सर्व कागदपत्रे ईडीच्या स्वाधीन केलेली आहेत. माझा हा लढा सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे सभासद असलेल्या ४० हजार शेतकऱ्यांच्या अस्तित्व आणि हितासाठी आहे आणि गेले अनेक वर्षे सत्ता उपभोगत शेतकऱ्यांवर खोटे प्रेम दाखवून कागलच्या जनतेची आणि ४० हजार शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या भ्रष्टाचारी वृत्तीविरोधात आहे..! असेही समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
Leave a Reply