१२ आजारी गाईंचा मृत्यू; ५२ गाईंचा मृत्यू… या चुकीच्या बातम्या कणेरी मठाबाबत शासनाचा मोठा खुलासा…

 

कोल्हापूर: दि. २७/०२ / २०२३ रोजीच्या नामांकित दैनिकातील कोल्हापुर आवृत्तीमधील प्रसिध्द झालेली संदर्भिय विषयाची बातमीस अनुसरून उपरोक्त संदर्भ व विषयांनुसार दि. २३.०२.२०२३ रोजी दुपार पासुन कणेरी मठातील गो शाळेशेजारील व मुक्त संचार गोठयातील २२ गोवर्गीय जनावरे पोटफुगीमुळे अत्यवस्थ असल्याचे कळाले अधिक माहिती घेतली असता महोत्सवातील भेट देणा-या भक्तगणांनी सदर गायींना चपाती खावु घातल्याचे कळाले. त्या अनुषंगाने तात्काळ पशुवैद्यकिय चमुने योग्य ते उपचार चालु केले त्यापैकी काही जनावरे बरी झाली व रात्री ती ३ गोवर्गीय जनावरे दगावली. पशु प्रदर्शन स्थळी कार्यरत पशुवैद्यकांनी उपचार केला तसेच रात्रीही पशुवैद्यक सदर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते..
दि. २४.०२.२०२३ रोजी ३० गोवर्गीय जनावरे आजारी आढळुन आली त्यापैकी उपचार चालु असताना ९ गोवर्गीय जनावरे दगावली. मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांचे उती नमुने / योग्य ते नमुने तपासणीसाठी पुणे येथे पुढील निदानासाठी पाठविण्यात आलेले असुन त्याचे निष्कर्ष येणे अदयाप बाकी होते. सध्यस्थितीत परिस्थिती आटोक्यात असून २ सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, व २० पशुधन विकास अधिकारी, १५ पशुधन पर्यवेक्षक उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
प्रसार माध्यमाव्दारे / व्हॉटसअॅप माध्यमाव्दारे चुकीच्या खेडसाळ बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ५० पेक्षा जास्त जनावरे दगावली आहेत असे वृतांक झाल्याचे निर्दशनास आले. ५२ जनावरे दगावली त्यात कसलेही तथ्य नसुन आजअखेर केवळ १२ गोवर्गीय जनावरे दगावली आहेत. वस्तुतः एकुण ५२ जनावरे बाधित झाल्यामुळे उपचार सुरु असाल्याची बाब निदर्शनास आलेली होती व ती वस्तुस्थिती खरी आहे.
वरील संदर्भात नमुद केल्याप्रमाणे दि. २७/०२ / २०२३ रोजीच्या दैनिकांतील कोल्हापुर आवृत्तीमधील वरील प्रसिद झालेली बातमीमध्ये ” शिळे अन्न खाल्यामुळे कणेरी मठावरील गायी दगावल्याचे रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या अहवालावरुन स्पष्ट झालेले आहे, ” असे विधान डॉ. वाय. ए. पठाण यांनी केलेचे नमुद केले असल्याचे छापुन आले आहे. वास्तविक पाहता नमुने तपासणीसाठी पुणे येथे पुढील निदानासाठी पाठविण्यात आलेले होते त्याचे निष्कर्ष आज दि. २७/०२/२०२३ रोजी दुपारी प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये जठररस, खादयांश यांचा सामू (पी.एच.) ३ ते ३.५ पर्यंत म्हणजेच अति आम्लीय (अॅसिडिक) असुन विषबाधेचा कोणताही अंश सापडला नाही.

वरील शासनाच्या खुलासाप्रमाणे मठावर १२ आजारी गाईंचा मृत्यू झाला. ही बाब सुद्धा अतिशय वेदनादायी आहे. भटक्या, भाकड जनावरांना सुद्धा मठातील गोशाळेत आणून त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ केला जात होता. पण लाखो लोकांनी भेट दिलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात काही लोकांनी पुण्य मिळेल या भावनेतून गाईला घरातून आणलेले अन्न खायला घातले. याचा त्रास त्या गायींना झाला परंतु १२ गाईंचा मृत्यू झाला असतानादेखील शहानिशा न करता ५२ गायींचा मृत्यू झाला. अशा बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्या. गायींचा मृत्यू झाल्याने स्वामीजींना या दुर्दैवी घटनेचे अतिशय दुःख झालेले आहे. ही घटना मनाला तीव्र वेदना देणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!