
कोल्हापूर/प्रतिनिधी: मी जे काही बोलतो ते सत्य बोलतो. त्यांनी बरच काही सोडलेला आहे. पण मी घाबरत नाही. संरक्षण असेल तर नक्की काढा. पण फालतू धमक्या देऊ नका. उपमुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बुद्धीला घरघर लागली आहे. तुरुंगाला मी कधीच घाबरत नव्हतो. तर शिवसेना पक्ष हा पुन्हा जोमाने येईल. महाराष्ट्रात कधी जात धर्मभेद नव्हता. पण महाराष्ट्रात विष पेरण्याचे काम त्यांनी सुरू केलेले आहे. हे जर थांबले नाही तर महाराष्ट्रात अराजकता माजेल, असे परखड भाषेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अतिशय वादग्रस्त पद्धतीने निवडणूक आयोगाची नेमणूक झालेली आहे. आणि मिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळालेल आहे. निवडणूक आयोग म्हणजे हातातलं बाहुल म्हणायला हरकत नाही. कोणत्याही मठावर किंवा आश्रमामध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य व्हायला पाहिजे. असे मठ राजकीय अड्डे व्हायला नकोत. पण कोल्हापूरची जनता पुढील निवडणुकीत सर्व काही बघून घेईल. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच जिंकेल असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील चोरमंडळामुळे वातावरण गढूळ झालेले आहे. पण पुढील निवडणूक मग ती महापालिका असो लोकसभा विधानसभा कुठल्याही सभागृहात पुढील निवडणुकीमध्ये हे गद्दार दिसणार नाहीत. जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. संपूर्ण जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील. कसबा भाजपचा बालेकिल्ला असताना देखील आज तेथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे. शिवसेनेच्या मदतीमुळेच भाजपला तिथे यश मिळत होते. पण डुप्लिकेट शिवसेनेचा किती प्रभाव आहे हे आता कसबा येथील जनतेला समजले असेल. मला जरी नोटीस काढली असली तरी मी कधी माघार घेत नाही. अलीबाबा चाळीस चोरांचे हे मंडळ आणि विधिमंडळातील आमदारांचा गट म्हणजे पक्ष नाही. संपूर्ण विधानसभा किंवा परिषद नाही. सुडाच्या भावनेने प्रत्येक गोष्ट ते करत आहेत. आणि महाराष्ट्र अश्या चोर आणि डाकुंच्या हातात आहे. तुमचा चहा घेतला नाही म्हणजे तुम्ही देशद्रोही कसे काय ठरता? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला. यावेळी
Leave a Reply