
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता सादर करण्यात आलेल्या रु.१०० कोटींच्या प्रस्तावास आज मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून यापूर्वी दोन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. परंतु, प्रस्तावातील काही त्रुटी आणि सुधारणा करून हा प्रस्ताव शासन स्तरावर पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
Leave a Reply