अन्विता सबनीस हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये निर्माण केले स्थान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :पुण्यातील, कु. अन्विता सबनीस या २३ वर्षांच्या मुलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पानांमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.तिने २४ तासांत मोटरसायकलवरून जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विक्रम केला. या विक्रमा करिता, तिने होंडा CBR 300F या मोटारसायकलवरून १.७४४ किलोमीटरचे अंतर कापले.

अन्विताने ६ मार्च २०२३ रोजी, सकाळी ६ वाजता तिने कोल्हापूर मधून हा प्रवास सुरू केला आणि ७ मार्च २०२३ रोजी सकाळी ६ वाजता हा प्रवास पूर्ण केला. तिचा विक्रमी प्रवास कोल्हापुरातून सुरू होऊन बंगलोर, हुबळी करत तमिळनाडूच्या सालेम पर्यंत जाऊन ती त्याच मार्गाने परतली आणि सातारा येथे प्रवास पूर्ण केला.
रविवार १२ मार्च २०२३ रोजी हॉटेल सत्कार ग्रांडे, ठाणे येथे अधिकृत सत्कार समारंभात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक म्हणून प्रतिनिधित्व करत असलेल्या श्रीमती. काश्मिरा मयांक शाह यांनी अन्विताला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे एक मेडल आणि सर्टिफिकेट प्रदान केले.यावेळी अक्षय देवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अक्षय देवलकर हे महाराष्ट्र शासनाचा “शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार” प्राप्तकर्ता आहेत. बॅडमिंटनमधील या खेळातिल त्यांच्या कामगिरीबद्दल त्याना २०१५ – २०१६ मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. ते २ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन आणि आशियाई संघाचे कांस्यपदक विजेता आहेत. त्यांनी अन्विताशी संवाद साधला व या संवादात तिचा हा विक्रम रचण्याचा संपूर्ण चित्तथरारक प्रवास समोर आला.कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून अन्विताने स्वतः एक स्मृतीचिन्ह तयार केले आहे. या स्मृतिचिन्हाचे अनावरण, प्रमुख पाहुणे श्री. अक्षय देवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर त्याच स्मृतीचिन्हाचे सर्व उपस्थित १०० प्रेक्षकांना वाटप करण्यात आले. अन्विताचा आज वरचा प्रवास चित्रीत करणारी ध्वनी – चित्र फित यावेळी दाखवण्यात आली. त्यासाठी श्री. उदय सबनीस यांनी आपला आवाज दिला आहे. ते चित्रपट आणि नाट्य जगतातील एक नामवंत अभिनेता आहेत. “व्हॉईस ओव्हरचा बादशाह” म्हणून ते ओळखले जातात.

अन्विता ही एक निसर्गप्रेमी व्यक्ती आहे आणि त्यामुळे नेहमीच तिला निसर्गाचे थरार आकर्षित करत असतात. हिमालयात अनेक ट्रेक करण्यासोबतच अन्विताने स्कूबा डायव्हिंग आणि स्कीइंगचे औपचारिक प्रशिक्षणही घेतले आहे. निसर्ग आणि खेळाप्रती असलेल्या या प्रेमामुळेच, तिने पुणे येथील भारती विद्यापीठातून शारीरिक शिक्षण (B.A. in Physical Education) या विषयात पदवी प्राप्त केली आहे.
श्री. अक्षय सोबतच्या टॉकशोमध्ये तिने हा विक्रम प्रस्थापित करताना आलेल्या विविध आव्हानांबद्दल सांगितले. अन्वितासमोरील सर्वात मोठे आव्हान होते संपूर्ण २४ तास जागे राहणे, विशेषत: रात्रीच्या वेळी. दिवसभरातील बदलत्या हवामानामुळे एक वेगळीच अडचण होती. दिवसा कडक उष्मा होता तर रात्री कडाक्याची थंडी होती. संपूर्ण राइड दरम्यान अन्विताने फ्युएलिंग ब्रेक्स सकट फक्त ७ थांबे घेतले. या विक्रमी प्रवासात अनेक अनपेक्षित आव्हाने होती. बेंगळुरूजवळ, अन्विताला जवळपास ३ तास ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला ज्यामुळे रेकॉर्ड बनवण्याची शक्यता कमी झाली. हा अनुशेष भरून काढणे हे अन्वितासाठी मोठे आव्हान होते. फ्युएलिंग ब्रेक्स व्यतिरिक्त, अन्विताने इतर सर्व थांबे कमी केले. अन्विताने तिच्या यशाकडे लक्ष केंद्रित केले आणि वचनबद्ध राहिली आणि येथेच तिने स्वतः सिद्ध करून २४ तासात १,७४४ कि.मी. अंतर मोटरसायकल चालवून हा विक्रम पूर्ण केला तिच्या या यशात तिचे आई ,वडील गुरुजन,शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!