आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

 

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.शिवाजी विद्यापीठ व शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मधुकर बामणे, अनिल शिंदे, राजन भोसले, राजाराम कुलकर्णी, विक्रम जाधव, अनंत छाजड, संतोष सुर्वे, विजय कोंडाळकर, संजय यादव आदी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब व फायटर्स क्लब यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून फायटर्स क्लबने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना मोगणे क्रिकेट क्लबने नऊ बाद 136 केल्या. मोगणे क्लबच्या शुभम मानेने 28 चेंडू 53 धावांची आकर्षक खेळी केली. प्रत्युतरादाखल फायटर्स क्लबने 20 षटकात सहा बाद १२३ धावा पर्यंत मजल मारली. सामन्यात मोगणे क्रिकेट क्लबने तेरा धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शुभम माने ठरला. त्याला संतोष सुर्वे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चे बक्षीस देण्यात आले.
शास्त्रीनगर मैदानावरील पहिला सामना पॅकर्स क्लब व भिडे स्पोर्ट्स यांच्यात झाला. पॅकर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारत 19.3 षटकात सर्व बाद 114 धावा केल्या. त्यामध्ये यश पाटीलने 32 चेंडू 46 धावा केल्या तर भिडे स्पोर्ट्स तर्फे विश्वजीत देवकातेने चार बळी घेतले प्रत्युतरादाखल फलंदाजी करताना भिडे स्पोर्ट्सने 13.1 षटकात सात विकेट राखून विजय मिळवला. भिडेच्या धनराज सोनुलेने 34 चेंडूत नाबाद 42 धावांची तर शरद पाटीलने 11 चेंडूत 31 धावांची धुवाधार खेळी केली. पॅकर्सच्या अजय चुयेकरने एक बळी घेतला. सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विश्वजीत देवकाते याला मिळाला. दुसरा सामना सागरमाळ स्पोर्ट्स विरुद्ध सातारा यांच्यात खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना सागर माळने 133 धावा केल्या. त्यामध्ये हर्षल भोगले 31 चेंडू 42 तर रोहित चौगुले 24 धावा केल्या. सिद्धार्थ जगदाळेने तीन बळी घेतले. सातारा संघाचे सर्व फलंदाज शंभर धावांमध्ये बाद झाले. पराग कुलकर्णीने 23 धावा केल्या तर दिनेश वऱ्हाडेने तीन बळी घेतले. सागर माळने 33 धावांनी विजय मिळवला. सामनवेचा पुरस्कार दिनेश वऱ्हाडेला मिळाला.
आजच्या दिवसातील शेवटचा सामना रमेश कदम अकॅडमी विरुद्ध पोलाईट क्रिकेट क्लब सांगली या संघामध्ये खेळण्यात आला. पोलाईटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पोलाईटने 18 षटकात 183 धावा केला. उत्तरादाखल रमेश कदम अकॅडमीने 18 षटकात 91 धावा केल्या. पोलाईट सांगली संघाने 92 धावांनी दणदणीत विजय संपादन केला 44 चेंडू 65 धावा करणारा आयुष खताडे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!