
कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज शिवाजी तरुण मंडळ व दिलबहार तालीम मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील सामन्यांची सुरुवात आरोग्यदूत बंटी सावंत, दीपक शेळके, निलेश भोसले, संजय घाटगे, राजेश घाटगे, उत्तम जाधव, शिवाजी कांबळे, अनिल कारंडे, उदय फाळके, विक्रमसिंह घाटगे, पंकज काटकर, राजेंद्र चौगुले, संपत चौगुले, तुषार इंदुलकर, अतुल जाधव, राहुल बैसाणे, शशी संगम, हरीष अनंतरामण यांच्या प्रमुख उपस्थित झाली.आजच्या दिवसातील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पीटीएम ब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शिवाजी संघाने पेटीएम ब संघाचा ३-० असा पराभव केला. इंद्रजीत चौगुलेने ३० व्या आणि संदेश कासारने ३७ व्या मिनिटाला गोल केला. मध्यंत्तरापर्यंत शिवाजीने २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ७६ व्या मिनिटाला संदेश कासारने गोल केला. पूर्णवेळेत शिवाजी संघाने पेटीएम ब संघाचा ३-० असा पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवाजी संघाच्या संदेश कासारची निवड झाली.
दुसरा सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिलबहार संघाने उत्तरेश्वर संघाचा ५-० असा पराभव केला. या सामन्यात १७ व्या मिनिटाला दिलबहारच्या संडे ओबेन गोल केला. डी च्या बाहेर मिळालेल्या फ्री किक वर संडे ओबेन उत्कृष्टरित्या गोल करून संघास १-०ची आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दिलबहारच्या ४७ व्या मिनीटाला पवन माळीने, ५९ व्या मिनीटाला मंहमद कुरशीद, ७८ व्या मिनीटाला शुभम माळी व ८० व्या मिनीटाला इम्यान्यूअलने गोल केला. पूर्णवेळेत दिलबहार तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा ५ -० असा पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दिलबहार संघाच्या पवन माळीची निवड झाली. युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते पवन माळी यांना बक्षीस देण्यात आले.
Leave a Reply