
कोल्हापूर : “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम व प्रॅक्टिस क्लब यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील सामन्यांची सुरुवात जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, उदय दुधाने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पवार, माजी नगरसेवक संजयकाका जाधव, काका पाटील, सुरेश ढोणुक्षे, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे, राजदीप भोसले, समीर कुलकर्णी, स्वप्निल रजपूत, संजय काटकर, अमर निंबाळकर, कमलाकर जगदाळे, अंकुश निपाणीकर, जयराम जाधव, किशोर खानविलकर, राहुल शिंदे, किरण दळवी यांच्या प्रमुख उपस्थित झाली.आजच्या दिवसातील पहिला सामना बालगोपाल तालीम विरूद्ध सोल्जर ग्रुप यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बालगोपालने सोल्जर ग्रुपचा २-० असा पराभव केला. या सामन्यात व्हिक्टर निक्वे याने १८ व्या व ३१ व्या मिनिटाला गोल केला. मध्यंत्तरापर्यंत बालगोपालने २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ही आघाडी कायम ठेवत बालगोपालने सोल्जर ग्रुपचा २-० पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बालगोपाल संघाच्या व्हिक्टर निक्वेची निवड झाली.आजच्या दिवसातील दुसरा सामना प्रॅक्टिस क्लब विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात २६ व्या मिनिटाला पेनल्टीवर राहुल पाटील यांने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत प्रॅक्टिसने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ही आघाडी कायम ठेवत प्रॅक्टिस क्लबने संध्यामठ संघाचा १-०ने पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रॅक्टिस क्लबच्या राहुल पाटीलची निवड झाली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला महेश उत्तुरे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
Leave a Reply