
राधानगरी : उसाच्या दरावर शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून असते. शेतकऱ्यानी मेहनतीने पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळावा आणि उस तोड वेळेत तोड मिळावी ही भूमिका घेऊन राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत लढा उभारला आहे. सभासदाच्या हितासाठी परिवर्तन आघाडीला साथ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. राधानगरी तालुक्यातील कुडुत्री, सोन्याची शिरोली, कसबा तारळे, पिरळ, सावर्धन व धामोड परिसरात आयोजित शेतकरी सभासदांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, सभासद हाच कोणत्याही संस्थेचा खरा मालक असतो. सभासदां च्या फायद्यासाठी संस्था कार्यरत असणे आवश्यक असते. कारखान्याचे खरे मालक असलेल्या सभासदांचा सन्मान राखण्यासाठी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन आवश्यक आहे.ज्येष्ठ सभासद शामराव चौगले म्हणाले, स्वाभिमानी शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता परिवर्तन आघाडीला साथ द्यावी.भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील म्हणाले, आमदार सतेज पाटील यांनी सभासदांच्या हितासाठी ही लढाई सुरू केली असून, सर्व सभासदांनी त्यांना पाठिंबा द्यावा.बाजीराव चौगले म्हणाले, महाडिकानी राजाराम कारखान्याच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी सभासदांना कारखाना विकासाचे गाजर दाखवत आहेत.यावेळी, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील – चुयेकर, आर. के. मोरे, पांडुरंग माने, जीवन पाटील, दिलीप कांबळे, मोहन पाटील, दत्तात्रय पाटील, हसन राउत, बाजीराव चौगले, चंद्रकांत चौगले, नंदकुमार पाटील, साताप्पा चौगले, बाबुराव म्हापसेकर, दिनकर पाटील, शिवाजी पाटील, विलास पाटील, पांडुरंग भांदीगरे, संजयसिंह पाटील, रविंद्र पाटील, धामोड सरपंच रेश्मा नवणे, जयसिंग चौगले आदी उपस्थित होते.
Leave a Reply