गोकुळ जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणार:आमदार सतेज पाटील

 

शिरोली : गोकुळ दूध संघामार्फत दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत संघाच्‍या विविध योजना दूध उत्‍पादकांच्‍या करीता प्रभावीपणे राबविल्‍या जात आहेत. संघाच्या वतीने वीस लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला असून हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली शिरोली दु.येथील दूध उत्पादकांनी आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरियाणा जातीच्या ५१ म्हैशी खरेदी केल्या त्याचे आज शिरोली दु येथे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते त्या जनावरांचे पूजन झाले व त्या दूध उत्पादकांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कि गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याचा आत्मा आहे आणि तो आत्मा टिकला तरच सामान्य शेतकऱ्याचे जीवन हे सुखकारक होणार आहे आणि त्या दृष्टीने सातत्याने गेल्या दोन वर्षांमध्ये दूध उत्पादक सभासदांना जेवढा न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने या ठिकाणी चालू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लम्पी आजार असेल इतर नैसर्गिक कारणानंमुळे असेल जगामध्ये दुधाचे उत्पादन घटले आहे. भविष्यात दूध उत्पादन वाढीच्या दृष्ठीने गोकुळने दूध वाढ कृती कार्यक्रम अंतर्गत दूध उत्पाकांनी जातिवंत म्हैस खरेदी केल्या असून पुढल्या काळामध्ये देखील जास्तीत जास्त चांगली जनावरे ही शेतकऱ्याला उपलब्ध कशी करून देता येईल हा प्रयत्न गोकुळ म्हणून आमचा निश्चितपणेअसणार आहे. सध्या जिल्ह्यातील दूध उत्पादकांना उच्च वंशावळीच्या जातिवंत म्हैशी (मुऱ्हा मेहसाणा जाफराबादी) खरेदी करण्यासाठी परराज्यात (पंजाब हरियाणा गुजरात) जावे लागते. अशावेळी मागणी वाढल्याने जनावरांच्या किमतीही वाढत आहेतयासाठी भविष्यात अशा प्रकारच्या जातीवंत दुधाळ म्हैशी गोकुळच्या कार्यक्षेत्रात तयार व्हाव्यात यासाठी गोकुळने जातिवंत म्हैस पैदास केंद्र उभारणी चा उपक्रम हाती घेऊ जेणेकरून चांगली जनावरे आपले जिल्ह्यातच मिळतील शिवाय भविष्यात सर्वांसाठी जातिवंत म्हीशींची खरेदी-विक्रीचे बाजारपेठ उपलब्ध होईल.

या कार्यक्रमास गोकुळचे अध्यक्ष विश्र्वास पाटील (आबाजी) यांच्यासह संचालक बाबासो चौगुले, अजित नरके, अंजना रेडेकर, शशिकांत पाटील चुयेकर, संभाजी पाटील, बयाजी शेळके,किसन चौगुले, अभिजित तायशेटे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, शशिकांत खोत, अनिल सोलापुरे, महादेव पाटील, गोकुळचे अधिकारी व लाभार्थी सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!