
कोल्हापूर:दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी यशवंत निवासस्थानी सकाळ पासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आमदार सतेज पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा, प्रेरणा आणि बळ देणारा असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकर्त्यांना एक आश्वासक नेतृत्व आणि एक नवी ऊर्जा म्हणूनही आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. आमदार सतेज पाटील यांच्यावर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतात.यावर्षी देखील आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आज सकाळी कुटुंबीयातील सदस्यांनी केक कापून आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्त्यां कडून वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या गेल्या. शिवाय वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन अनेक कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले. इचलकरंजी येथे शहर काँग्रेस कार्यालयाच्या वतीने, सतेज मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचबरोबर चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील दुर्गमवाडी वस्तीवर राहणाऱ्या, अतिशय हलाखीत जीवन जगणाऱ्या ५१ गोरगरीब कुटुंबाची घरं आमदार सतेज पाटील यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त सौर दिवे लावून तेजोमय करण्यात आली. हा उपक्रम, पुणे येथील कॉनसॉफ्ट कंपनीचे विनय जोशी यांनी राबवला. कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष सविता रायकर आणि मनीषा बुचडे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 51 लाभार्थीना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. सकाळी 9 ते 2 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत आमदार पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्या..
वाढदिवसानिमित्त आयोजित वह्या संकलन उपक्रमात लाखांहून अधिक वह्या जमा झाल्या. यामध्ये कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण आणि माजी महापौर सागर चव्हाण यांनी 51 हजार वह्या दिल्या. तसेच पॅरालॉम्पिक स्पोर्टस असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने यांच्यासह दिव्यांग बांधवांनी देखील रॅलीने येवून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनीही वह्या सुपूर्द केल्या. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे आणि संचालकांनी आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त गणी आजरेकर कुटुंबीयांच्या वतीने कलिंगडचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास साठे मोहन सालपे यांच्या वतीने वाढदिवसासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. रामकृष्ण जाधव यांनी रक्तदान शिबीराचा उपक्रम राबीवला. तसेच कसबा बावडा नागरी पतसंस्था चेअरमन दिलीप नाटेकर यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचे ग्रंथ येथील हनुमान मंदिर झानेश्वर मंदीरास आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय मंडलिक, निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, डी वाय पी ग्रुप चे अध्यक्ष संजय पाटील, आमदार ऋतुराज पाटील, के पी पाटील, राहुल पाटील (सडोलीकर ), गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, अरुणकुमार डोंगळे, भैया माने, युवराज पाटील, कर्णसिंह गायकवाड, मा.आ. सुरेश साळोखे, नगराध्यक्ष राजेखान जमादार, अमरसिंह माने, अरुण जानवेकर, अमर यशवंत पाटील, अंबरीश घााटगे, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहर प्रमुख सुनिल मोदी रविकिरण इंगवले, डी सी पाटील (माजी अध्यक्ष जि प ), बाजीराव खाडे, बाळसाहेब खाडे, शशांक बावचकर, संजय कांबळे, मधुआप्पा देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, आर के पोवार, व्यंकाप्पा भोसले,
अँड. महादेवराव आडगुळे, नितीन जांभळे, दिलीप मोहिते बापू, आनंद माने, शिवराज नायकवडे, शशिकांत खवरे, विजयसिंह जाधव (बापू ) पी एम पाटील ( चेअरमन पंचगंगा साखर कारखाना ), बाबासो देवकर, अजित नरके, प्रा शहाजी कांबळे, बी एच पाटील, हरीष चौगले, किशाबापु किरुळकर, उदयसिंह पाटील कौलवकर , पंडीतराव केणे, रणजीत देशमुख (खटाव ),कॉंग्रसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, बाळासाहेब सरनाईक , उदयानी साळुंखे, अर्जुन आबिटकर बाबासो चौगले, बयाजी शेळके , प्रल्हाद चव्हाण, रामराजे कुपेकर, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक नगरसेविका, गोकुळचे संचालक, बार असोसिएनचे पदाधिकारी , कॉग्रेसचे पदाधिकारी विविध सेलचे पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, एच के पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे निंबाळकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ सुनील केदार, माजी मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री नितीन राऊत, खासदार उदयनराजे छत्रपती, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विक्रम सावंत, आमदार विक्रम खडसे, सरोज अहिरे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, शशिकांत शिंदे, महिला प्रदेशध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार जयंत आसगांवकर , माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार उल्हास पाटील, माजी खासदार जयंवतराव आवळे, उद्योगपती व्ही बी पाटील, ए.वाय पाटील, मनोहर शिंदे आदीनी दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply