राष्ट्रीय मॉडेल स्पर्धेत डी.वाय.पाटील फार्मसी अव्वल

 

कोल्हापूर : न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्कीन मॉडेल फॉर अॅक्ने’ या थ्रीडी मॉडेलला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांनी, महाविद्यालय सुरु झाल्यानंतर चारच महिन्यात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेले हे यश अभिमानास्पद असल्याचे सांगत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची सुरुवात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या परवानगीने जानेवारी 2023 ला झाली. अल्पावधीतच या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत हे यश मिळवले आहे.  डॉ. अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद तांबे, मैनुद्दीन मुजावर, श्रुती पाटील व तितिक्षा खांडेकर या विद्यार्थ्यानी हे मॉडेल सादर केले.  चेहऱ्यावर येणारे  पिंपल्स- मुरमे यावरील औषध उपचाराबाबतचे हे मॉडेल आहेन्यू पॉलिटेक्निकआणि न्यू कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने आयोजित ‘डीजीफेस्ट’ स्पर्धेत अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे सुजित देसाई यांनी काम पाहिले.  न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार, न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांच्या हस्ते डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्याना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.कुलपती डॉ. संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!