
कोल्हापूर:राज्याला सक्षम आणि वैभवशाली बनवणाऱ्या उद्योगांना ताकद देण्याचे काम काँग्रेसचा औद्योगिक सेल करीत आहे. उद्योजकांसाठी जातीपातीच्या पलीकडे उद्योग हा एकच धर्म असतो.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संस्था एकसंध पणे काम करत आहेत, ही गोष्ट अभिनंदनीय, कौतुकास्पद आणि राज्याला दिशादर्शक देणारी आहे. कोल्हापुरातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा औद्योगिक सेल खंबीरपणे उद्योजकांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांनी दिली.कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्त झाल्याबद्दल युवा उद्योजक सत्यजित जाधव यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीत कोल्हापूरचे विमानतळ नाईट लॅन्डीगच्या सुविधेसह पूर्ण क्षमतेने सुरू करावे. कोल्हापूर विमानतळावरून देशातील महत्त्वाच्या शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू करावी. जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील जागा पूर्ण भरल्याने नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी आणखी दोन औद्योगिक वसाहतींची निर्मिती करावी. राज्यातील विजेचे दर इतर राज्याच्या तुलनेत कमी करावेत व ते स्थिर ठेवावेत.लॉजीस्टीक पार्क उभारण्यात यावे. औद्योगिक कचर्याची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी. आंतरराष्ट्रीय उद्योग कोल्हापूरात उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल तसेच स्थानिक उद्योजकांनाही चालना मिळेल, यामुळे कोल्हापूरात मोठा औद्योगिक प्रकल्प यावा. आंतरराष्ट्रीय उद्योग कोल्हापूरात उभारल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल तसेच स्थानिक उद्योजकांनाही चालना मिळेल, यामुळे कोल्हापूरात मोठा औद्योगिक प्रकल्प यावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.औद्योगिक क्षेत्रातील बी टेन्यूअरचा प्रश्न, कर आकारणी अशा विविध समस्यांवर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी डॉ हेमंत सोनारे म्हणाले, उद्योजक सक्षम बनला पाहिजे, औद्योगिक विकास झाला पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन राजकारण विरहीत काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे काम सुरू आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक उद्योजकांच्या समस्या सोडवण्यात यश मिळाले आहे. आता कोल्हापुरात सत्यजित जाधव यांच्या रूपाने नवा चेहरा औद्योगिक सेलला मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून कोल्हापुरातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
*उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोल्हापुरातील उद्योगासमोरील आव्हाने व संधी याबाबत विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सोनारे यांनी सांगीतले.
युवा उद्योजक सत्यजित जाधव म्हणाले हे पद म्हणजे उद्योजक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची मिळालेली संधी आहे. या माध्यमातून उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, गोशीमाचे अध्यक्ष दीपक चोरगे, स्मॅक अध्यक्ष दीपक पाटील, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, सीआयआयचे उपाध्यक्ष अजय सप्रे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब कोंडेकर, उद्यम सोसायटीचे उपाध्यक्ष नितीन वाडेकर, गोशिमाचे उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, प्रदिपभाई कापडिया, शिवाजीराव पवार, महेश दाते, काँग्रेसचे औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, मायकल अॅन्थो, वहिदा मुजावर, सुरेखा देसाई, भेंडवडीच्या सरपंच स्नेहल माने आदी उपस्थित होते.
Leave a Reply