
शिरोली:राजाराम कारखान्याची सत्ता आपल्याच ताब्यात रहावी यासाठी महाडीकानी अनेक बोगस सभासद केले आहेत. अमल महाडिक यांनी गगनबावड्यातील साखरी गावात ११८ गुंठे डोंगराळ जमिनीवर त्यांनी तब्बल 58 बोगस सभासद केले आहेत. त्यासाठी अमल महाडिक यांनी २ लाख रुपये गहाणवट घेऊन चावरेतील लोकांना सभासद करून घेतले. म्हणजेच केवळ दोन गुंठे उस क्षेत्रावर सभासद करण्याची करामत त्यांनी केली असल्याचा घणाघाती आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण यांनी केला. राजर्षी छ. शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने शिरोली येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.महेश चव्हाण पुढे म्हणाले, गंडवे फसवेगिरी हाच महाडीकांचा धंदा आहे. सभासदांच्या उसाला योग्य दर नाही, वेळेत तोड नाही अशा सर्व माध्यमातून शेतकर्यांची पिळवणूक सुरु आहे. उसतोड मागायला जाणाऱ्या शेतकऱ्याना दिलीप पाटील म्हणतात, मी शिरोलीच्या मतांवर निवडून येते नाही. १२१ गावातील मतदारांच्या मतावर मी विजयी होतो. गावातील मतदारांचा अपमान करणाऱ्याना शिरोलीकर हिसका दाखवतील.
सर्जेराव माने म्हणाले, दिलीप पाटील यांच्या ट्रक्टरला १३ किमी अंतरासाठी १७२ रुपये वाहतूक दर दिला जातो, मात्र इतरांच्या वाहनाना १३२ रुपये दर मिळतो, हा फरक का?
आमदार सतेज पाटील म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण त्यांनी पिकवलेल्या उसाच्या दरावर अवलंबून आहे. राजाराम कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या उसाला अन्य कारखान्याच्या बारोबरीने दर दिला जाईल. तसेच सभासद हिताचे निर्णय घेतील, त्यामुळे परिवर्तन आघाडीच्या ‘अंगठी’ला भक्कम साथ द्या.
शशिकांत खवरे म्हणाले, आपल्याला सत्तेची हव्यास नाही, आपल्याला राजकारण करयचे नाही असे महाडिक म्हणतात, तर महाडीकांनी स्वतः च्या घरात दोन उमेदवार का दिले? सर्वात कमी दर व कमी गाळप अशी या कारखान्याची ओळख करून ठेवली. काटामारी,कमी दर देऊन महाडीकांनी कारखाना लुटणाऱ्याना धडा शिकवा.
यावेळी बी एच पाटील, सुरेश यादव, पंडितराव खवरे,अनिल खवरे,उत्तम सावंत, डॉ गुंडा सावंत,राजकुमार पाटील,सरदार मुल्ला,लियाकत गोलंदाज,बाजीराव सातपुते,उत्तम पाटील,प्रवीण पुजारी विनोद पुजारी, राजू सुतार,संदीप कांबळे, माजी संचालक बी टी देशमुख, सचिन पाटील,मोहन सालपे,गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, केडीसी बँक संचालक स्मिता गवळी, जोतीराम पोर्लेकर, शिवाजी पोवार, सुनील पाटील, दीपक लमबे, पंडित खवरे, भैया इंगवले यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply