
पट्टणकोडोली : अंगठी हे नाते जोडणारे प्रेमाचे प्रतीक आहे. राजारामचे सभासद आणि कारखाना यांच्या नात्यात आलेला दूरावा दूर करण्यासाठी नाते जपणाऱ्या परिवर्तन आघाडीच्या ‘अंगठी’ला साथ द्या, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. हातकणगले तालुक्यातील संभापूर येथे झालेल्या परिवर्तन आघाडीच्या प्रचार फेरीत बोलत होते.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी या लढाईत उतरली आहे. शेतात घाम गाळून पिकवलेला उस सभासद कारखान्याला घालत असतो. हाच सभासद हा कारखान्याचा खरा मालक असल्याने त्याच्या मताला महत्व आहे. मात्र सत्ताधाऱ्याच्या २८ वर्षातील कारभारामुळे सभासद व कारखान्यातील नात्यात दुरावा आला आहे. हा दुरावा संपवून, आपुलकीचे प्रेमाचे नाते जोडण्याचे काम परिवर्तन आघाडीची अंगठी नक्कीच करेल याचा विश्वास देतो.माजी सरपंच प्रकाश झिरंगे म्हणाले, महाडिकांनी संस्था कधी उभारल्या नाही तर दुस-याच्या संस्था बळकावल्या. सभासद ही आता महाडिकांना कारभारला कंटाळले आहेत. संभापूरकर हे स्वाभिमानी आहेत आणि स्वाभिमानीच राहतील. होवू घातलेल्या या निवडणुकीत संभापूरकर मोठ मताधिक्य देवून परिवर्तन घडवतील.या प्रचार फेरीमध्ये उमेदवार शिवाजी किबिले, अभिजित माने, दिलीप पाटील, फारुख महालदार, अवधूत झिरंगे, आकाश मांडेकर, ओंकार मिरजकर, अविनाश चौगुले, सुरज झिरंगे सनी पाटील, दिनेश निकम, राजेंद्र मिरजकर, संतोष पेटकर अक्षय खामकर यांच्यासह स्थानिक सभासद या प्रचार फेरीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply