
कोल्हापूर: प्रतिनिधी : चिमुकल्यांपासून अबालवृद्धांपर्यंत आकर्षण आणि करमणुकीचा खेळ असलेली राजकमल सर्कस कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे. आजपासून बच्चे कंपनी सोबत कुटुंबियांना या सर्कशीची मजा लुटता येणार आहे. कोल्हापुरातील इ.पी.स्कूल मैदान, कलेक्टर ऑफिस शेजारी, नागाळा पार्क येथे राजकमल सर्कसने आपला तंबू टाकला असून, सुमारे ३२ कलाकारांच्या विविध अंगभूत कला कसरती आणि विदुषकांची हास्य धमाल येथे अनुभवता येणार आहे. सर्कशीचे रोज दुपारी १.३० वाजता, ४.३० वाजता आणि सायंकाळी ७. ३० वाजता असे तीन खेळ असणार आहेत.
तीस इंचाचा विदूषक, मौत का कुआ, उंच झोक्यावर अंधारात झुलणार्या तरुण- तरुणी, सायकलिंग, डान्स, फायर डान्स आणि नजरेला खिळवून ठेवतील अशा जिम्नॅस्टिकच्या अंगभूत कसरती, ब्रिक्स बॅलन्स, गन शुटींग, भोवरा लट्टू, मोटर सायकल जंप येथे अनुभवायला मिळणार आहे.तसेच मणिपुरी कलाकारांची प्रात्यक्षिके हे या सर्कसचे प्रमूख आकर्षण असणार आहे. राजकमल सर्कसमध्ये भारतातील आसाम, बंगाल,ओरिसा, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यातील कलाकारांसोबतच नेपाळी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. सुमारे आठशे लोक एकाच वेळी बसून हा शो बघू शकणार आहेत. यापूर्वी संपूर्ण भारतभर या सर्कशीचे शो झाले आहेत.
राजकमल सर्कसचे दररोज तीन खेळ असणार आहेत. अनेक प्रात्यक्षिके कलाकार सादर करणार आहेत. तिकीट दर १०० ते ४०० रुपये आहे, अशी माहिती राजकमल सर्कसचे मालक रफिक शेख आणि चालक उमेश आगाशे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी जितेंद्र सिंग उपस्थित होते.
Leave a Reply