गोकुळचे टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हेनीला लस्सी ग्राहकांच्या सेवेत   

 

कोल्‍हापूर:मुंबई, पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा व अन्य शहरांमधील चोखंदळ  ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करून दृढ विश्वास निर्माण केलेले गोकुळने आणखीन नवीन टेट्रापॅक मधील मँगो,व्‍हेनिला लस्सी व मसाला ताक ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.गोकुळ प्रकल्प येथे संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वासराव पाटील यांच्या शुभहस्ते  व इतर मान्यवर संचालक तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत टेट्रापॅकमधील मसाला ताक व मँगो, व्हेनीला लस्सी चे  लॉंचिंग करणेत आले.संघाने सध्या मॅंगो व व्हेनीला या दोन प्रकारच्या फ्लेवर मध्ये लस्सीचे २००मि.ली. टेट्रा पॅकमध्ये व मसाला ताकाचे २०० मि.ली. टेट्रामध्ये पॅकींग घेण्यात आले आहे.सदरचे पॅकिंग दि. ०३-०५-२०२३ रोजीपासून बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरच्या लस्सीमध्ये उच्च दर्जाचे फ्लेवर वापरणेत आले असून लस्सी व ताकावर युएचटी ट्रिटेड प्रक्रिया केली असल्यामूळे लस्सी व ताक नॉर्मल टेंपरेचरला १८० दिवस टिकून राहणार आहे. यामूळे संघाकडे शिल्लक  राहणाऱ्या दुधाची निर्गत करण्यामध्ये चांगल्याप्रकारे मदत होणार असून सदरची टेट्रापॅक मधील मँगो, व्हेनीला लस्सी व मसाला ताक निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे गोकुळचे चेअरमन  विश्वासराव पाटील  यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!