६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, तरुण मंडळे, बचत गटांच्या सदस्यांसह सर्व घटकांनी सहभागी व्हावे व इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करुया.. असेही आवाहन त्यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!