थेट पाईपलाईनचे प्रलंबित काम मे अखेर पूर्ण करा; आ.ऋतुराज पाटील, आ.जयश्री जाधव यांच्या सूचना

 

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन तसचं शहरातील इतर विविध प्रश्न संदर्भात आज आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी आज महानगरपालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, नियाज खान, राजेश लाटकर, आशपाक आजरेकर आदी प्रमुख उपस्थित होते.थेट पाईपलाईन संदर्भात आढावा घेताना, या प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित कामे मे अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या. वेळ काढू पणा करू नका संबंधितांनी गांभीर्याने घ्यावं, कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही अशा शब्दातही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडनी केली. युनिटी कन्सल्टंटचे विजय मोहिते यांनी, बिद्री सब स्टेशन पासून काळमवाडी पर्यंतची वीज कनेक्शन नेण्याची आहे. त्यातील बिद्री साखर कारखान्याच्या इथून चार किलोमीटर अंडरग्राउंड लाईन नेण्याचे काम बाकी असल्याचं सांगितलं. यावर आमदार ऋतुराज पाटील यांनी महावितरण कडून ज्या परवानग्या आवश्यक आहे त्या तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी सोमवारी 8 तारखेला स्वतंत्र बैठक घेऊ असं देखील त्यांनी सांगितलं. प्रत्येक बैठकीला वेगळा मुद्दा उपस्थित करू नका, बैठकीमध्ये ज्या सूचना केल्या आहेत त्याची पूर्तता करून पुढील बैठकीत याबाबत माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली.आमदार जयश्री जाधव यांनी, जॅकवेलचे काम अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जाणीव पूर्वक हा प्रोजेक्ट, संबंधित कंपनी लांबणीवर पाडत आहे काय? अशी विचारणा आमदार जाधव यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!