
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोव्यात लोकप्रिय ठरलेला असा कुडचडेचा चंदेरी महोत्सव यंदापासून गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या ५० व्या पुण्यतिथी वर्ष निमित्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूर येथे शनिवार दि. ६ मे ते ८ मे २०२३ तीन दिवस कोल्हापूरात रंकाळा चौपाटी खराडे कॉलेज मैदानवर खास उभारण्यात येणाऱ्या रंगमंचावर होणार आहे. अशी माहिती दयानंद कला केंद्रचे अध्यक्ष मोर्तु नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.या महोत्सवाचे उदघाटन उद्या ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता उद्योजक दीपक मगर यांच्या हस्ते व भंडारी समाजचे अध्यक्ष व दयानंद कला केंद्रचे उपाध्यक्ष अशोक नाईक भंडारी यांची उपस्थितीत होणार आहे.यावेळी महापालिका माजी महापौर सौ.सई खराडे यांची उपस्थिती असणार आहे.या महोत्सवाची संकल्पना स्वदेश संस्कृती दर्शनावर आधारित अपना गांव , अपना गोवा, अपना भारत अशा स्वरूपाच्या महोत्सवात गोमंतकाची आणि विशेष करून सांगे – केपे तालूक्याची सांस्कृतिक परंपरा बरोबर भारतीय लोक परंपराचे दर्शन करून देणारा असेल. कुडचडे – सावर्डे ही शहरे गोव्याच्या संस्कृतिची केंद्र बिंदू आहेत. ह्या शहराभोवताली अनेक पर्यटन स्थळे, राजकीय, समाजिक स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय स्तरावरील साहित्यीक कलाकाराची ही भूमी आहे. आणि हा इतिहास सदर महोत्सवातील कार्यक्रमाद्वारे लोकांसमोर प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने केंद्राने हा उपक्रम हाती घेतला असून ह्या योजनेला राज्य सरकार कला व संस्कृती, माहिती खाते पर्यटन, मस्तोद्योग, ग्रामीण यंत्रणा, आदिवासी खात्याचे सहकार्य लाभणार असे कळते तसे प्रयत्नही संस्थेतर्फे सुरू आहेत.
महोत्सवात पहिल्या दिवशी गोवा दर्शन, कला संगम म्हार्दोळतर्फे लोककला कार्यक्रम व कोंकणी नाट्य प्रवेश, दुस-या दिवशी राष्ट्रीय स्थरावर नैपुण्य मिळविलेल्या गोमंतकीय गायक वादक संगितकाराचा गझल कार्यक्रम, नवाब शेख वास्को यांची मराठी गिते, तर तिस-या दिवशी महाराष्ट्र दर्शन हा मराठी संस्कृतिवर आधारित लावणी, पोवाडे, नाट्यगिते, अभंग असा कुडचड्यातील कलाकार आणि गोव्याच्या कलाकारांचा कार्यक्रम होणार. तसेच एक साहित्य विषयक कार्यक्रम बहुभाषिक विनोदी काव्य ‘हास्य कल्लोळ’ , त्याच दिवशी ‘रायगडाला जेव्हा जाग येते ‘ ह्या नाटकातील एक प्रसंग कुडचडे – सावर्डे भागातील नाट्यकलाकार सादर करणार. गोवा सरकारचे कला व संस्कृती खाते, पर्यटन खाते, माहिती खाते अशा प्रकारचे कार्यक्रम रोड शो, देश – विदेशात आयोजित करतात. त्याच प्रकारे ह्या कार्यक्रमाला सुध्दा शासकीय योगदान लाभेल अशी अपेक्षा संस्था बाळगून आहे.यावेळी दयानंद कला केंद्रचे उपाध्यक्ष सुभाष नाईक,बंटी उडेलकर कोषाध्यक्ष नवीन खांडेकर,सचिव गोविंद गावडे,महिला विभाग प्रमुख सौ.आनंदी नाईक उपस्थित होते.
Leave a Reply