
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आज आपलं निरीक्षण नोंदवल. त्यानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युती सरकारवर शिक्कामोर्तब झाले असून, या निकालाचे कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमत शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून साखर – पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवे झेंडे फडकवीत “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे आगे बढो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर नागरिकांना शिवसैनिकांनी साखर – पेढे वाटले.
Leave a Reply